एमआयटी एडीटी विद्यापीठात रिसर्च व इनोव्हेशन सेंटरची सुरूवात विद्यापीठाच्या पाचव्या तुकडीचे व्हर्च्युअल माध्यमांद्वारे स्वागत

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


कृपया प्रसिद्धीसाठी दि. 10 सप्टेंबर 2020



पुणे, ता. 10: एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, लोणी काळभोर विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने अभ्यासक्रमांची रचना केली आहे. जागतिक स्तरावरील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना मुर्तरुप देण्यासाठी सेंटर फॉर रिसर्च अँड इनोव्हेश फॉर यंग अस्पिरंटस (एमआयटी एडीटीयु क्रिया) सुरूवात करण्यात आली. याचे डिजिटल उद्घाटन आयआयटी मुंबईच्या मॉनास रिसर्च ॲकदमीचे सीईओ श्री. एम. एस. उन्नीकृष्णन, आण्णा विद्यापीठ, चेन्नईचे कुलगुरू एम. के सुरप्पा, महाराष्ट्र अन्न व औषधी प्रशासनाचे आयुक्त अरुणराव उन्हाळे, एमआयटी एडीटी विद्य़ापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या हस्ते करण्यात आले.   


दरम्यान एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या पाचव्या तुकडीचे व्हर्च्युअल माध्यमांद्वारे स्वागत करण्यात आले. यावेळी ज्योती कराड-ढाकणे, डॉ. सुनीता कराड, विद्यापीठीचे कुलसचिव शिवशरण माळी यांच्यासह सर्व स्कूल व कॉलेजचे अधिष्ठाता, संचालक, प्रिन्सिपल आणि शिक्षक उपस्थित होते. यावेळी बाराशे हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आजपासून विद्यापीठातील सर्व स्कूल व कॉलेजच्या प्रथम वर्षाच्या ऑनलाईन शिक्षणाची सुरूवात करण्यात आली.


विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री. उन्नीकृष्णन म्हणाले, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीकोनातून एमआयटी एडीटी विद्यापीठाने रिसर्च अँड इनोव्हेश सेंटर ची सुरूवात केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या सोबतीने अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले देशाचे नेतृत्व करणारे विद्यार्थी घडविणे हा यामागचा उद्देश आहे. देशाच्या प्रगती आणि विकासाची जबाबदारी ओळखून विद्यार्थ्यांनी करिअर घडवावे. या विद्यापीठामध्ये शिक्षणासंबंधीची विचारवंतांची पाठशाळा आहे. कोणत्याही विद्यापीठात शिक्षण घ्या, पण प्रथम मी भारतीय आहे. याची जाण ठेवा. देशात अनेक संधी आहेत. 


डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, तंत्रज्ञानाच्या माध्यामातून जग खूप जवळ आले आहे. नवीन शिक्षण धोरणासोबत नवकल्पनांना पंख देण्याचे काम या विद्यापीठांतून होत आहे. आगामी काळात वेब तंत्रज्ञान, आर्टिफिशयल इंटालिजन्सचा वापर करून शिक्षण द्यावे लागणार आहे. कोरोना महामारीमुळे जगाची अवस्था कठीण झाली आहे. यातून बाहेर काढण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे. देशातील सर्व धर्मग्रंथ जगण्याचा सिद्धांत शिकवतात. युवकांनी तंत्रिक ज्ञानाबरोबरच आध्यात्मिक ज्ञानाचा सांगड घालून यश संपादन करावे. 


एमआयटी एडीटीयु क्रिया विषयी अधिक माहिती देताना डॉ. मंगेश कराड म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकास साधण्यासाठी आम्ही सदैव तत्परतेने कार्य करत आहोत. तंत्रज्ञानाने जगाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. युएएस, चीन, युके या देशामध्ये तंत्रज्ञानाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात इनोव्हेशन होताना दिसत आहे. अशा प्रकारचे इनोव्हेश भारतात व्हावे आणि भारतीय अर्थव्यवस्थेला मजबुत करता यावे यासाठी क्रिया या व्यासपीठाची सुरूवात करण्यात आली आहे. विविध कल्पनांना मुर्त रुप देण्य़ासाठी एक व्यासपीठ म्हणून क्रियाची सुरूवात करण्यात आली आहे. अध्यापकांनी आऊट ऑफ बॉक्स विचार करून नवकल्पनांचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यासाठी प्रशिक्षण देण्याचे काम व्हावे. इंडस्ट्रीसोबत सामंजस्य करार करून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानातील संधी उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच क्रियाच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार आहोत. क्रियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या करिअरसंदर्भात बदल करण्यात येईल. 


कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. सुराज भोयर यांनी केली. प्रा. स्वप्निल सिरसाठ आणि प्रा. स्नेहा वाघटकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रजनीश कौर सचदेव यांनी आभार व्यक्त केले.