पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*कर्मवीर भाऊराव पायगोंडा पाटिल*
*खरे शिक्षण महर्षी.* ..
*आज भाऊराव (आण्णा) ची जयंती.* .
माझ्या वडिलांना आण्णाना खुप जवळून पाहता आले, त्यांच्या कार्यामधून खुप काही शिकता आले व त्यांचा आदर्श ठेऊन वाटचाल सुद्धा करता आली.
*रामदास भिमाजी पवार, (माझे वडिल) यानी जेव्हा- जेव्हा कर्मवीर आण्णा पांडवनगर जवळील त्यांच्या रयत च्या शाळेत म्हणजेच, हुतात्मा राजगुरू विद्यालय मधे यायचे तेंव्हा माझे वडिल त्यांना भेटण्याची संधी चुकवत न्हवते.*
कर्मवीर आण्णा नी जशी माझ्या वडिलांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली, मग काय माझे वडिलांनी *रयत च्या यूनियन बोर्डिंग हाउस साठी, रामोशीवाडी 1970 किवा त्या दरम्यानच काळात रुपये ५०००.०० मिळवुन दिले ,*
*माझ्या वडिलांना सगळ्यात भावलेली कर्मवीर आण्णा ची गोष्ट म्हणजे, त्या काळात वडारवाडी सारख्या ठिकाणी लोक पाउल ठेवायला घाबरत असत, अश्या दुर्लक्षित परिसरामधे शिक्षणाची खरी मुहूर्तमेढ रोवली ती आण्णानी व त्या हुतात्मा राजगुरू विद्यालयामधून आजपर्यंत किती पुण्यातील नामवंत व्यक्ती शिकुन गेले याची गणना करणे थोड मुश्किलच.*
तत्कालीन मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक सोबत शाळेला दिलेल्या सदिच्छा भेटीचे खुप छान वर्णन केल आहे.
*शाळेसाठी निधी उभा करुन देण्यात माझ्या वडिलांचा खारीचा वाटा होता, कारण येथूनच आपल्या सारख्या असंख्य वडार समाजातील युवा पिढी घडणार होती.*
हाच माझ्या वडिलांचा मी वारसा चालवत *हुतात्मा राजगुरू मधील शेटे मैडम यांच्या मार्गदर्शनातून जी मिळेल ती मदत करण्याची संधी मी सोडत नाही. त्या शाळेमधे निवासी असणारया मुलांसाठी शालेय साहित्य वाटप मला करता आले तसेच आणखी बरेच उपक्रम राबविले आहे व अजुनही बरच काही करायचे आहे.*
माझे व कर्मवीर अण्णा यांची *जन्मतारीख एकच 22...
त्यांची 22 सप्टेंबर व माझी 22 नोव्हेंबर...बाकी साम्य तस काही नाही.*
पण, माझ्या नजरेत ही व्यक्ती खुप आदर्श आहे, त्यांच्या दुरदृष्टी ची तोड ना कोणाला जमली, ना ही कोणाला जमू शकेल.
*या पूज्यनीय व वंदनीय व्यक्तीच्या जयंती निमित्य त्रिवार अभिवादन*...
*महेंद्र पवार*
अध्यक्ष
मुकेश प्रतीष्ठान*