जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली  पिसुर्टी व जेऊर या ठिकाणी पालखी महामार्गाकरिता संपादित होणाऱ्या क्षेत्राच्या नुकसान भरपाई वाटपाबाबत शिबीर ( कॅम्प) घेण्यात आले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


पुणे, दि. २- . यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई बाबत तसेच लागणाऱ्या कागदपत्रांबाबत उपजिल्हाधिकारी सुनील गाढे आणि इतर अधिकाऱ्यांकडून


सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच काही कागदपत्रे जागेवरच जमा करून घेण्यात आली .प्रतिज्ञापत्र करण्यासाठी तसेच कागदपत्रांच्या फोटो कॉपी काढण्यासाठी जागेवरच सर्व व्यवस्था करण्यात आली .त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. 57 लाखांच्या प्रकरणामध्ये शेतकऱ्यांमध्ये किरकोळ वाद होता. त्याबाबत समुपदेशन करून तसेच कायदेशीर बाबींची माहिती जमीन धारकांना देऊन तो जागेवरच सोडवला व या प्रकरणात कागदपत्रांची पूर्तता सुद्धा तात्काळ करून घेतली. कोरोना संसर्गाच्या काळात चांगली रक्कम हातात पडत असल्यामुळे शेतकरी आनंदी असून त्यांनी शासन व प्रशासन दोघांनाही धन्यवाद दिले आहे.