विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवणं हीच* *डॉ. गोविंद स्वरुप यांना खरी श्रद्धांजली ठरेल...* _*- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


_*उपमुख्यमंत्री कार्यालय,*_


_*मंत्रालय मुंबई*_


_दि. ८ सप्टेंबर २०२०_


*_


      मुंबई, दि. ८ : ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरुप यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून डॉ. स्वरुप यांना अपेक्षित वैज्ञानिक दृष्टीकोन विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे व देशात विज्ञानाच्या अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण करणं, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. 


            उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, डॉ. गोविंद स्वरुप हे भारतातील रेडीओ खगोलशास्त्राचे जनक होते. देशविदेशात त्यांनी उभारलेल्या अत्याधुनिक रेडीओ दुर्बीणींनी मानवाला सूर्याचा वेध घेण्याची शक्ती दिली. पुण्यातील खोदड-नारायणगाव तसंच उटी येथे त्यांनी उभारलेल्या महाकाय दुर्बिणींच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील व युवकांना रेडिओ खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी प्रेरीत करतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करुन त्यांना आदरांजली वाहिली.


*****