कोरोना रुग्णांना त्वरित उपचारासाठी  कोविड सेंटर व कोविड हॉस्पिटल बाहेर ओपीडी सुरु करून ओपीडीतही तात्काळ उपचार सुरु करावेत -आबा बागुल 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल पुणे :- कोरोना विषाणू बाधित  रुग्णांना कोणत्याही हॉस्पिटलमध्ये त्वरित वैद्यकीय उपचार सुरु होण्यासाठी हॉस्पिटलच्या   ओपीडीमध्ये देखील वैद्यकीय उपचार सुरु करण्याची गरज आहे. त्यासाठी कोणत्याही कोविड हॉस्पिटलमध्ये ओपीडी नसून हॉस्पिटल बाहेर मंडप उभारून ओपीडी सुरु करून तेथे डॉक्टर,नर्सेस व वॉर्डबॉय यासह व्हेंटिलेटर व ऑक्सिजनची सुविधा निर्माण करावी आणि रुग्नांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होईपर्यंत ओपीडीमध्येच त्वरित उपचार सुरु व्हावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी केली. 


            ते म्हणाले की , रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र मनपा,राज्य शासन आणि खासगी हॉस्पिटल्सची क्षमता कमी पडत आहे. अश्या वेळी हॉस्पिटलमध्ये  बेड मिळेपर्यंत कोरोना बाधित रुग्णांना तिष्ठत बसावे लागते.  व त्या मौल्यवान  वेळी वैद्यकीय  उपचार सुरु न झाल्यास तो रुग्ण दगावणायची भीती असते. नुकतेच  पुण्यात एक ५४ वर्षाची  महिला व एक तरुण पत्रकार पांडुरंग रायकर यांना वेळेत उपचार सुरु न झाल्यामुळे व हलगर्जीपणा झाल्यामुळे त्यांचा दुरदैवी मृत्यू झाल्याचे वृत्त प्रकाशित झाले आहे. अश्या अनेक केसेस आहेत त्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत त्यामुळे रुग्ण दगावतात त्याची कधीही गांभीर्याने दखल प्रशासनाने  घेतली नाही. त्यासाठीच हॉस्पिटल बाहेर ओपीडी उभारून त्यांचे त्वरित उपचार सुरु व्हावेत. व हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध झाल्यावर रुग्नांना शिफ्ट करावे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना देखील याची कल्पना द्यावी. यामुळे वेळीच उपचार सुरु होऊन रुग्णांचे  प्राण वाचतील. सध्या त्या रुग्णांना कोणत्याही हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नसल्यास ओपीडीत तात्पुरते उपचार सुरु करून वैद्यकीय दिलासा देण्याची गरज आहे. काही तासानंतर हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध झाल्यावर त्या रुग्णास शिफ्ट करणे शक्य असते. यासाठीच मनपा,राज्य शासन अथवा खासगी हॉस्पिटल मध्ये ओपीडी मधेच तातडीचे वैद्यकीय उपचार अश्या रुग्नांना  मिळण्याची व्यवस्था  व्हावी.कोणालाही रुग्णालयात जागा नाही म्हणून परत पाठवू नये त्यांचे उपचार ओपीडीत सुरु करून त्यांना हॉस्पिटलमध्ये जागा झाल्यावर शिफ्ट करावे.   वेळ प्रसंगी  हॉस्पिटल बाहेर तात्पुरता मंडप उभारून तेथेही ओपीडी सुरु करता येऊ शकेल . रुग्णांना वाचवण्यासाठी मौल्यवान वेळ वाया जाऊ नये यासाठीच प्रशासनाने  याचा विचार करावा व त्वरित कृती करावी