*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
कर्जत-खोपोली नियोजित राष्ट्रीय महामार्गावर विजेचे खांब
कर्जत,दि .25 गणेश पवार
कर्जत येथून खोपोली येथे मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकसित केला जात आहे.या महामार्गावर कर्जत पासून अनेक ठिकाणी विजेचे खांब उभे असून त्या खांबामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दरम्यान,राज्य रस्ते विकास महामंडळ कडून त्या विजेच्या खांबाबद्दल कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली हाळ फाटा असा नवीन राष्ट्रीय महामार्ग बनविला जात आहे.आरसीसी काँक्रीटचा तो नवीन मार्ग असून उपलब्ध जागेनुसार रस्ता बनविला जात आहे.पूर्वी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण मधून हाळ फाटा ते कर्जत आणि पुढे कल्याण असा रस्ता दुपदरी करण्यात आला होता.त्यामुळे अपवाद वगळता या रस्त्याचे जुन्या रस्त्यावरच राष्ट्रीय महामार्ग म्हणून काँक्रीटकरण सुरू आहे.मात्र या रस्त्याचे काम पाहणाऱ्या राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजे एमएसआरडीसीने काम उरकण्यावर भर दिला आहे असे दिसून येत आहे.कारण त्या रस्त्यात येणाऱ्या अडचणी देखील एमएसआरडीसी कडून सोडवल्या जात नाहीत असे दिसून येत आहे.त्यामुळे रस्ता जरी नव्यांर होत असला तरी त्या रस्त्यामुळे पूर्वी असलेल्या समस्या आणि अडचणी यांना सामोरे जातच रस्त्यावर प्रवास करावा लागत आहे.
कारण या दुपदरी रस्त्यावर कर्जत पासून पुढे खोपोली कडे जात असताना अनेक ठिकाणी विजेचे खाम्ब उभे आहेत.हे विजेचे खाम्ब खोपोली येथून कर्जत साठी जी मुख्य वीज वाहिनी येते त्या वीज वाहिनेचे खांब आहेत.त्यात अनेक खाम्ब हे रस्त्याच्या मधोमध असून त्या खांबांवर रात्री प्रवास करणारे वाहन चालक धडकून पडू शकतात.आणि मोठया अपघाताला त्या वाहनचालक यांना सामोरे जावे लागू शकते.रस्त्याच्या मधोमध ते खांब असल्याने वाहन चालक यांना त्या खांबांबाबत माहिती मिळावी यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता होती.मात्र रस्त्यावर टाकलेल्या काँक्रीटच्या रस्त्यावर उभे असलेले विजेचे खांब नवीन वाहन चालक यांना समजणार नाहीत.हे लक्षात घेऊन रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने त्या ठिकाणी रेडियम च्या पट्ट्या लावून माहिती देणे आवश्यक होते,त्याचवेळी अलीकडे माहिती फलक लावण्याची गरज होती,मात्र तशी कोणत्याही स्वरूपातील खबरदारी घेण्यात आली नाही.त्याचवेळी रस्त्यावर गेल्या वर्षापासून काँक्रीटकरणाचे काम सुरू असून रस्त्यात अडथळा ठरणारे विजेचे खाम्ब हलविण्याचा प्रयत्न देखील रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून केला गेला नाही.त्यामुळे त्या विजेच्या खांबांना धडकून अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.
किशोर शितोळे -स्थानिक
पोलीस मित्र संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष
रस्त्यावर अनेक ठिकाणी कामे अर्धवट ठेवली आहेत आणि त्याबाबत कोणत्याही सूचना वाहन चालक यांना प्रवास करताना दिसतील अशा लावण्यात आलेल्या नाहीत.त्याचवेळी विजेचे खाम्ब अनेक ठिकाणी मधोमध असून त्यावर धडकून अपघात होण्याची शक्यता असताना ते हलविले जात नाहीत.तर खांबांवरून जाणारी वीज वाहिनी ही मुख्य वाहिनी असल्याने एखादी गाडी धडकल्यास त्या ठिकाणी मोठा वीज प्रवाह रस्त्यावर येऊन अपघात होऊ शकतो.
बी के निफाडे-उपअभियंता, राज्य रस्ते विकास महामंडळ
रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी आम्ही रस्त्यात अडथळे ठरणारे विजेचे खांब बाजूला करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.मात्र त्याबाबत महावितरण इन्फ्रा विभागाकडून पुढील आदेश आले नसल्याने ते खांब रस्त्यात उभे आहेत.तर वाहन चालक यांना माहिती व्हावी यासाठी सूचना फलक लावण्यासाठी कार्यवाही केली जाईल.
फोटो ओळ
रस्त्यात उभे असलेले विजेचे खांब
छाया- गणेश पवार
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*