अजित पवार यांचा करोना बाधितांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना इशारा;

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


म्हणाले…......


पुणे :- “करोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी रूग्णालयांनी आकारावयाच्या दरासंबंधी यापूर्वीच शासनाकडून आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे कुठल्याही रूग्णालयाने त्याहून जादा दर आकारू नये. असा प्रकार झाल्याचे आढळताच संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच औषधांचाही काळाबाजार करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल,” असा इशारा उपमुख्यमंत्री व पुण्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिला. “माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत करोनाचे निदान होवून वेळेत उपचार करणे सुलभ होणार असल्याने, ही मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवा,” असे निर्देशही त्यांनी दिले. पुण्यातील विधानभवन सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही अत्यंत महत्वाकांक्षी मोहीम सुरू केली आहे. घरोघरी जावून या मोहिमे अंतर्गत प्रत्येक कुटुंबाची आरोग्याच्या दृष्टीने तपासणी होणार आहे. या मोहिमेमुळे करोनाचे पूर्वनिदान होण्यास मदत होणार आहे. यातून रुग्णाला वेळेपूर्वीच उपचार मिळतील व रुग्ण लवकर बरा होईल. त्यामुळे माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम प्रभावीपणे राबवा,” असे निर्देशही त्यांनी दिले. करोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांसाठी इतर आवश्यक उपचाराबाबतही दक्षता घेण्याच्या सूचना करून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “करोनाबाधितांची वाढती संख्या विचारात घेत उपचारासाठीच्या सुविधांही सातत्याने वाढविण्यात येत आहेत.