पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


**


            पुणे,दि.25 :जिल्हा प्रशासनातर्फे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


उप जिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे, तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, नायब तहसीलदार श्रावण ताते यांनीही अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


0000