"इज्जतीत घरी रहा" हे गाणे नुकतेच झी म्युझिक वर प्रदर्शित करण्यात आले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


कोरोनाच्या कठीण काळात देश आता लॉकडाऊन कडून अनलॉक कडे वाटचाल करत आहे. तरीदेखील कोरोनाचे जगावरील संकट कायम आहे, अश्यातच सरकारतर्फे आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा अश्या सूचना दिल्या जात आहेत, तरीदेखील अनेक तरुण आज बाहेर फिरताना दिसतात. त्यामुळे युवकांमद्धे प्रचलित झालेले शब्द वापरून तैयार केलेले असून त्याला युवकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.


"इज्जतीत घरी रहा" हे बोल असलेल्या या गाण्याचे दिग्दर्शन व संकलन अनिल शिंदे यांनी केले असून विकी मगर यांनी है गीत गायले आहे संगीत चिराग आसोपा यानी केले आहे तर प्रोडक्शन ची जबाबदारी अजय शिंदे यांनी सांभाळली आहे.


   याबाबत बोलताना दिग्दर्शक अनिल शिंदे म्हणाले की "पश्चिमात्य संगीताचा प्रकार असलेला रॅपसॉंग हा प्रकार तरुणाईला भुरळ घालताना दिसतो, त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक उत्तम गाणी आजवर रसिकांसमोर आली, पण रॅपसॉंग हा प्रकार हाताळला गेला नव्हता त्यामुळे हे गाणे केले, आणि त्याला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे."