ऑनलाइन अभ्यासवर्गात व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई.....

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



मुंबई : ऑनलाइन अभ्यासवर्गांमध्ये अनोळखी व्यक्ती शिरून शिक्षकांना छळण्याचे प्रकार वाढत आहेत. याची राज्याच्या सायबर विभागाकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली असून असे प्रकार घडल्यास तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे आवाहन सायबर विभागाने शिक्षक, शिक्षण संस्थांना 


केले आहे. सायबर विभागाच्या वरिष्ठ 


अधिका ऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन अभ्यास वर्गांत विद्यार्थ्यांव्यतिरिक्त त्रयस्थ व्यक्ती शिरतात. अश्लील विनोद, शिक्षकांबाबत आक्षेपार्ह, अश्लील शेरेबाजी करून लुप्त होतात. या प्रकारांमुळे विद्यार्थ्यांसह, शिक्षकांचे लक्ष विचलित होते, वेळ वाया जातो, अशा तक्रारी राज्याच्या विविध भागातून विभागाला प्राप्त झाल्या. तक्रारींची संख्या वाढू लागल्यानंतर सायबर विभागाने मुख्याध्यापक, शिक्षकांसोबत वेबसंवाद साधला. असे प्रकार घडल्यास त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी पोलीस ठाणे गाठून तक्रार देण्याचे आवाहन उपस्थितांना करण्यात आले. याबाबत तांत्रिक तपास करून व्यत्यय आणणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतला जाईल, असे उपअधीक्षक बालसिंह राजपूत यांनी सांगितले. हा हॅकिंगचा प्रकार नाही. मात्र शाळेकडून विद्यार्थ्यांना पाठविण्यात येणारी ऑनलाइन अभ्यासवर्गाची लिंक काही विद्यार्थी ठरवून इतरांना शेअर करतात, असे निरीक्षण सायबर विभागाने नोंदवले.