कृष्णाबाई बलभिम नेटके (वय ९२)...... कळंबमधील ९२ वर्षांच्या आजींनी लावले कोरोनाला पळवून

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


वालचंदनगर : कळंब (ता. इंदापूर) येथील ९२ वर्षाच्या आजीबाई कोरोनावर यशस्वी मात केली असून आजीबाईंची तब्येत कोरोनानंतर ठणठणीत झाली आहे.


इंदापूर तालुक्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळू लागले आहेत. इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील वालचंदनगरमधील दोन सख्या भावांचा, बेलवाडीमधील मुलगा व वडिलांचा तसेच कळंबमधील एका शिक्षकांचा मृत्यू झाल्यामुळे पश्‍चिम भागातील नागरिकांच्या मनामध्ये कोरोनाविषयी भिती निर्माण झाली होती.


कोरोनावरती मात करणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असून कोरोनाविषयीची भिती कमी होवू लागली आहे. कळंबमधील कृष्णाबाई बलभिम नेटके (वय ९२) यांच्या सह कुंटूबातील पाच जणांना गेल्या आठवड्यामध्ये कोरोनाची लागण झाली होती.यामध्ये १४ वर्षाच्या मुलाचाही समावेश होता.


सर्वांना इंदापूरमधील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले. सोमवारी (ता.१४) रोजी आजीसहित सर्वांना घरी सोडले असून सर्वांची तब्येत ठणठणीत आहे. यासंदर्भात आजीचे नातू पोपट चव्हाण (वय ४०) यांनी सांगितले की, आईची आई कृष्णाबाई काेरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांनी कोरोनावरती मात केली असून त्यांची तब्येत चांगली ठणठणीत आहे. नागरिकांनी कोरोना झाल्यानंतर घाबरुन जावू नये. योग्य उपचार केल्यानंतर कोरोना बरा होत असून नागरिकांनी काळजी करण्याऐवजी काळजी घेण्याचे आवाहन केले.


(संपादन : सागर दिलीपराव शेलार)