पुणे प्रवाह न्युज पोर्टल
#शिवसेना
स*
आ.डॉ. नीलम गोर्हे, प्रवक्ता, शिवसेना यांनी आज दिवंगत पत्रकार कै.पांडुरंग रायकर यांच्या परीवाराची विचारपुस केली.सात्वंन केले .त्यांच्या भगिनी सौ.खेतमाळी यांनी अनेक व्यथा मांडल्या.श्री.पांडुरंग रायकर यांचा म्रुत्यु दुर्दैवी असुन राज्य सरकारच्या वतीने त्याबाबत चौकशी चालु आहे असे नीलमताई गोर्हे यांनी सांगितले. सरकार व समाज सर्वच रायकर परिवारासोबत आहेत असे सांगुन एक लाख रुपयांची मदत नीलमताई गोर्हे यांनी शिवसेना प्रवक्ता व आमदार या नात्याने व्यवस्था केली.यावेळी रायकर परिवाराचे नातेवाईक टीव्ही ९ श्री.कुणाल जयकर व योगेश बोरसे ,पुणें यांचे सहकार्य मिळाले.