लोककलावंतांच्या विविध समस्यां शासन दरबारी मांडण्याकरिता ; जिल्हाधिकारी पुणे येथे आंदोलन संपन्न*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


प्रसार माध्यमांकरीता प्रसारित


विषय : पुण्यातील नाट्यगृह व सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्यात यावे याबद्दल पुणे शहरातील लावणी, लोकधारा, नाटक, सिनेमा, एकपात्री, नृत्य, साऊंड, लाईट, बॅकस्टेज यांच्या वतीने दि.८ सप्टेंबर २०२० रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराजराजे भोसले, शरद सांस्कृतिक कला-क्रीडा प्रतिष्ठानचे लक्ष्मीकांत खाबिया, ऑल आर्टिस्ट फाऊंडेशनचे योगेश सुपेकर, साऊंड लाईट इलेक्ट्रीकल्स असोसिएशनचे शैलेश गायकवाड, राजीव गांधी विचार मंडळ ट्रस्टचे विनोद निनारीया, परिवर्तन कला महासंघचे अध्यक्ष अमर पुणेकर, पप्पू बंड, चित्रसेन भवार तसेच शहरातील कलेच्या घटकांतील प्रतिनिधी उपस्थित होते.


        यावेळी १०० ते १५० लोकांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्यावी, नाट्यगृह सुरू करावे, कलाकारांच्या मुलांची शैक्षणिक फीमाफ करावी, कलाकारांना इतर लघु उद्योगास अनुदान द्यावे, कोरोना संकट काळात प्रत्येक कलाकाराला १० हजार रूपयांची तातडीची मदत करावी व लोककलावंतासाठी १ हजार कोटी रूपयांची तरतूद असलेले स्वतंत्र लोककलावंत आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.