प्रादेशिक ( आर.टी.ओ.) कार्यालय सकाळी साडे सात वाजता उघडले...

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



पुणे : कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर कार्यालयांतील गर्दी कमी करण्यासाठी आवश्यकतेनुसारच कर्मचारी व नागरिकांना बोलविले जात आहे. त्याचा दैनंदिन कामकाजावरही परिणाम झाला आहे. पण दुसरीकडे पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नागरिकांच्या सोयीसाठी चक्क सकाळी ७.३० वाजताच कार्यालय उघडून शिकाऊ परवान्यांसाठी चाचणी घेण्यास सुरूवात केली आहे. सकाळी ७.३० वाजता शिकाऊ चाचणीला सुरूवात होणे, असे राज्यात पहिल्यांदाच घडले आहे.राज्यातील परिवहन कार्यालयांमध्ये शिकाऊ पक्का परवान्याच्या चाचणीसाठीचा कोटा वाढविण्याच्या सुचना परिवहन आयुक्तांनी दिल्या होत्या. पण कोरोना संकटाच्या पार्श्वभुमीवर कोटा वाढविल्यास संसर्गाचा धोका अधिक होता. त्यातच पुण्यामध्ये बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे आर.टी.ओ. अजित शिंदे यांनी चाचणीच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला. पूर्वी सकाळी १०.३० वाजल्यापासून कार्यालयामध्ये शिकाऊ चाचणीला सुरूवात होत होती. पण ही वेळ सोमवारपासून सकाळी ७.३० करण्यात आली आहे. दिवसभरात प्रत्येक तासाला १०० याप्रमाणे ७०० जणांची चाचणी घेतली जाणार आहे. त्यामुळे चाचणीसाठीचे वेटिंग १ ते २ दिवसांवर आले आहे.