सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११७ वा पदवीप्रदान समारंभ गुरुवार १० सप्टेंबर, २०२० रोजी 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


विविध विद्याशाखांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील एकूण ७०३५ विद्यार्थ्यांना दिली जाणार पदवी प्रमाणपत्रे 


 


पुणे, दिनांक ८ सप्टेंबर २०२० :


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११७ वा पदवीप्रदान समारंभ गुरुवार दिनांक १० सप्टेंबर, २०२० रोजी संध्याकाळी ४. ३० वाजता ऑनलाईन पद्धतीने व विद्यापीठाच्या काही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमासाठी मा. डॉ. नौशाद डी. फोर्ब्स, सह-अध्यक्ष, फोर्ब्स मार्शल प्रा . लि . हे प्रमुख अतिथी या नात्याने ऑनलाईन पद्धतीने स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण देतील, तसेच मा . राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सुद्धा ऑनलाईन पद्धतीने पदवी प्रदान समारंभात सहभागी होऊन समारंभाचे अध्यक्षीय भाषण देतील.


  सन २०१८-१९ मध्ये व तत्पूर्वी उत्तीर्ण झालेल्या विविध विद्याशाखांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील एकूण ७०३५ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात येणार आहेत. त्यापैकी १०४ पीएच. डी. पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेले विद्यार्थी आहेत. सदर पीएच. डी.विद्यार्थ्यांपैकी ७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान समारंभात पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. 


        पदव्यांची संख्या पुढीलप्रमाणे - 


पदविका - ३८ 


पदवी - ५१८७


एम.फिल - १३


पदव्युत्तर पदविका - ५१


पीएचडी - १०४


पदव्युत्तर - १६४२


     सध्या कोरोना (कोव्हीड - १९) च्या महामारीच्या प्रादुर्भावामुळे सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर पुढील १५ दिवसांमध्ये पोस्टाद्वारे पदवी प्रमाणपत्र पाठविण्यात येणार आहेत.


  ११७ व्या पदवीप्रदान समारंभाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या unipune.ac.in या संकेतस्थळावर पाहता येईल.