पुणे प्रवाह न्युज पोर्टल
**.
*पुणे :-* राज्यातील पत्रकारांच्या अधिस्वीकृती पत्रिकांचे नूतनीकरण ३१ मार्च पर्यंत करण्यात येते. तथापि सध्या कोविड १९ विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या पत्रिकांचे प्रत्यक्ष नूतनीकरण करणे शक्य झाले नसल्यामुळे ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वैध समजण्यात येतील असे संदर्भीय परिपत्रकान्वये कळविण्यात आले.
कोविड-१९ विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अधिस्वीकृती पत्रिका अद्यापही प्रत्यक्ष नूतनीकरण करणे शक्य नाही, त्यामुळे सदर *अधिस्वीकृतीपत्रिका दिनांक ३० सप्टेंबर २०२० पर्यंत वैध समजण्यात येतील*.