फिल्ड ऑफिसर महिलेचा एस पी इन्फोसिटी च्या वरिष्ठांकडून महिलेचा विनयभंग,

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


फिल्ड ऑफिसर महिलेचा एस पी इन्फोसिटी च्या वरिष्ठांकडून महिलेचा विनयभंग,


पुणे :- प्रतिनिधी आन्सेक सेक्युरिटी येथे सात वर्षापासून काम करणाऱ्या 30 वर्षीय महिलेचा एस पी इन्फोसिटी च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विनयभंग केल्याची धक्कादायक घटना हडपसर येथील कार्यालय मध्ये घडले सदर महिला 7 सप्टेंबर रोजी एस पी इन्फोसिटी च्या कार्यालयात तेथील सिक्युरिटी कामाचा आढावा घेण्यासाठी गेले असता तेथील अधिकारी जहीर डिसूजा यांनी महिलेचे विचारपूस करत तुमच्यासाठी आमच्याकडे वजन कमी करण्यासाठी डायट प्लान आहे असे सांगत त्यांना जेवणाचे आमंत्रण दिले नऊ सप्टेंबरला ही महिला आपल्या फिल्ड ऑफिसर समवेत कंपनीच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या फूड कोर्ट येथे दुपारी जेवण्यासाठी गेले असता जेवण झाल्यानंतर हात धुवत असताना जहीर डिसूजा यांनी पाठीमागे येऊन त्यांना जाणीवपूर्वक धक्का दिला व महिलेला सावरण्याचा बहाणा करत तिच्या शरीराला घाणेरडा स्पर्श केला या घटनेमुळे सदर महिला घाबरली व तिथून जात असताना डिसोझा यांनी जबरदस्तीने तिच्या हाताला पकडून तो मला आवडली आहेस असे म्हणत तिच्या शरीराला झोपण्याचा व तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला या घडलेल्या प्रसंगाची माहिती या महिलेने सहकाऱ्याला दिली त्यानंतर या महिलेने व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन दिवसानंतर कुठेही वाच्यता न करता हा प्रसंग कंपनीचे वरिष्ठ अधिकारी राजेश पोंगट 


 त्यांना सांगण्याचा निर्णय घेतला त्यांना सांगण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार हे महिला आणि तिचा सहकारी याने घडलेला दुर्दैवी प्रकार राजेश पोंगट यांना सांगितला सदर घटनेचा विरोध करावयाचा सोडून पुन्हा त्यांनी घडलेल्या घटनेचे समर्थन केले व त्यामध्ये काय नवीन आहे ही तर कॉमन गोष्ट आहे असे म्हणत माझाही तुमच्या मध्ये इंटरेस्ट आहे असे म्हटले हे ऐकून महिलेच्या सहकार्याने त्यांना तुम्ही शुद्धीवर आहात का असे म्हणत तिथून निघाले या घटनेने अजून घाबरलेल्या महिलेने या कंपनीच्या वरिष्ठांचे महिला कर्मचाऱ्याकडे बघण्याचा व शोषण करण्याचा मानसिकतेबद्दल आणि घडलेल्या प्रसंगाविषयी आपल्या पतीला सांगितले यानंतर या महिलेच्या पतीने आपल्या पत्नीला आधार देत हडपसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्याचा निर्णय घेतला 26 सप्टेंबर रोजी सकाळी ही महिला हडपसर पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यास गेली असता तेथील पीआय रमेश साठे यांनी त्यांना रात्री अकरा वाजेपर्यंत बसल्यानंतर तक्रार दाखल करून घेतली परंतु अद्याप कंपनीच्या वरिष्ठ यांना अटक केली नाही या घटनेने कर्मचारी महिलेच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आल्याचे दिसून येते पुढील घटनेचा तपास पीएसआय शिरसागर करत आहे