प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी 'रस माधव वटी' उपयुक्त ठरेल* *महापौर मुरलीधर मोहोळ;

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


#PRESSNOTE FOR PUBLICITY


 


'विश्ववती चिकित्सालया'तर्फे २० हजार कोरोनायोद्ध्यांना 'रस माधव वटी'चे मोफत वितरण*


----------------------------------------------------


*पुणे महानगरपालिकेतील २० हजार कोरोना वॉरियर्सना* 


*'विश्ववती चिकित्सालया'तर्फे 'रस माधव वटी'चे वाटप*


पुणे : "पुणे शहराच्या नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, कोरोनावर नियंत्रण मिळवता यावे, यासाठी पुणे महानगरपालिकेचा प्रत्येक कर्मचारी सैनिकासारखा लढतो आहे. या कोरोना वॉरियर्सना त्यांची रोगप्रतिकार क्षमता चांगली राहण्यासाठी श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटरतर्फे देण्यात येणारी रस माधव वटी उपायकारक ठरेल," असे मत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.


            परमपूज्य सद्गुरु श्री आनंदनाथ महाराज सांगवडेकर यांच्या आशीर्वादाने व राजवैद्य समीर जमदग्नि यांच्या मार्गदर्शनाने चालविण्यात येत असलेल्या 'चला... भारत सशक्त करूया' मोहिमेअंतर्गत श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटर, कोल्हापूर आणि क्विकहिल फाउंडेशनच्या वतीने पुणे महानगर पालिकेतील २० हजार कोरोना वॉरियर्सना (सफाई कर्मचारी, वार्ड ऑफिसर, पालिकेतील इतर कर्मचारी) रस माधव वटीचे वितरण उपक्रमाचा शुभारंभ मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाला. पालिकेच्या महापौर कार्यालयात झालेल्या या सोहळ्याला संयोजक वैद्य तुषार सौंदाणकर, वैद्य राहुल शेलार, क्विकहिल सीएसआर हेड अजय शिर्के, वैद्य श्रीकांत काकडे, वैद्य गिरीश शिर्के, वैद्य अभय जमदग्नी, वैद्य विनय सचदेव आदी उपस्थित होते.


मुरलीधर मोहोळ म्हणाले, "गेली साडेपाच महिने पालिकेचे अधिकारी, कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करताहेत. इतरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी धडपडणाऱ्या महापालिकेतील या कोरोनायोद्ध्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी अनेक संस्था पुढे येताहेत. कोरोनाशी लढताना रोगप्रतिकार क्षमता चांगली राहण्यासाठी ही रस माधव वटी उपयुक्त आहे. याचा पालिकेतील जवळपास २० हजार अधिकारी-कर्मचारी यांना लाभ होईल."


वैद्य तुषार सौंदाणकर म्हणाले, "सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टतर्फे या माधव रसायन, रस माधव वटीचे वितरण केले जात आहे. साथीचे आजार रोखण्यासाठी हे महत्वपूर्ण असून, हे औषध संशोधनपूर्ण आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनाची याला मान्यता आहे. गेल्या चार महिन्यात विविध जिल्ह्यात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी आदी दीड लाखकोरोनायोद्ध्यांना या काढ्याचे व वटीचे मोफत वाटप करत आहोत."


आरोग्य आरोग्य, क्षेत्रीय कार्यालय, घनकचरा व्यवस्थापन आदी विभागामार्फत सफाई कर्मचारी, वार्ड ऑफिसर, पालिकेतील इतर कर्मचारी या रस माधव वटीचे वाटप केले जाणार आहे. महापौरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सुरक्षारक्षक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना रस माधव वटीचे वाटप करण्यात आले.