रायगड माझा चे संपादक संतोषजी पवार यांचे निधन

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*



 *रायगड :-* अतिशय धक्कादायक बातमी ! रायगड माझा चे संपादक संतोषजी पवार यांचे


निधन झाले असून त्याच्या या आकास्मक जाण्याने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.अत्यंत कल्पक बुद्धी असलेले संतोष पवार यांनी सकाळ मधून पत्रकारितेला सुरुवात केली.शासनाच्या अधिस्वीकृती समितीवर


ते कार्यरत होते. माथेरान येथे पतपेढीवर सचिव होते.तसेच माथेरान नगरपालिकेवर नगरसेवक म्हणूनही काम पाहिले.पहिल्यांदा त्यांनी रायगड माझा ही वृत्तवाहिनी सुरू केली तिला प्रचंड प्रतिसाद मिळत असताना त्यांनी ही वृत्तवाहिनी महाराष्ट्र स्तरावर नेले आणि एक अग्रगण्य वाहिनी बनवली.सकाळी त्यांना कर्जतच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.त्यांची ऑक्सिजन पातळी कमी होत असताना त्यांना ऑक्सिजन लावून नवी मुंबई येथे हलवण्यात आले. मात्र चौक येथे गेल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.एक हरहुन्नरी आणि कल्पक बुद्धी असलेला पत्रकार गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.


स्व. संतोष पवार यांचे


अकस्मात निधन ! मनाला चटका लावून जाणारी बातमी ! अजून किती लोकांचा नाहक बळी जाणार ! माथेरान चे माझी नगर सेवक ते पत्रकार आणि संपादक अशी ओळख असणारी प्रेमळ व्यक्ती आपल्याला अचानक सोडून जाते.मनाला न पटणारी घटना ! आपल्या लेखणीतून अन्यायग्रस्त लोकांसाठी सदैव सहकार्य करणारे संपादक संतोषजी पवार यांना साश्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🌸


🌺🌷🌹💐💥🌸🌹🌷🌻💐🌺💥 सा. पुणे प्रवाह परिवारा कडून भावपूर्ण श्रद्धांजली 🌸🌺🍿🌹💥🙏🙏🙏🙏🙏🙏🙏