पद्मभूषण डॉक्टर पद्माकर रामचंद्र दुभाषी यांचे सोमवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


पुणे- भारतीय विद्या भवन पुणे केंद्राचे अध्यक्ष, माजी केंद्रीय सचिव त्यांच्या मागे पत्नी, विवाहीत मुलगा, कन्या, सून, नातवंडे असा परिवार आहे.डॉक्टर दुभाषी यांनी राज्य व केंद्र शासनात 40 वर्षे विविध पदांवर काम केले. गोवा विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू होते. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. प्रशासकीय सेवेबद्दल त्यांना 2010 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सोमवारी दुपारी त्यांच्यावर वैकुंठ स्मशाभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.