वागळे इस्टेट पोलिसांनी अवघ्या दोन तासांमध्ये रिक्षा चोराच्या मुसक्या आवळल्या

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


**


ठाणे :- इसम नामे नदीम अब्दुल समद सय्यद वय ३१ वर्षे राहणार हजुरी दर्गा रोड गौतम नगर हाजुरी वागळे इस्टेट ठाणे यांची स्वमालकीची रिक्षा क्रमांक MH 04 GN 0391 ही त्यांचे राहते घराजवळ विराज हॉस्पिटलच्या समोर वागळे इस्टेट ठाणे येथे पार्क करून ठेवली होती तसेच साक्षीदार नामे सुरेंद्र प्रभाकर उपाध्याय राहणार मालती देवी शाळेच्या मागे अंबिका नगर नंबर 2 वागळे इस्टेट ठाणे यांची स्वतःच्या मालकीची बजाज कंपनीची रिक्षा क्रमांक MH 04 GN 2968 ही अंबिकानगर नंबर 2 हनुमान मंदिरा जवळ सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला पार्क करून उभे केले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने वरील दोन्ही रिक्षा त्यांच्या संमतीशिवाय लबाडीने चोरून नेले असले बाबत आज दिनांक 28/09/ 2020 रोजी सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास गुन्हा रजिस्टर नंबर 79 /2020 भादवि कलम 379 प्रमाणे नोंद करण्यात आला आहे. तेव्हा सदर गुह्याची माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो. श्री. दत्तात्रय ढोले, पोलीस निरीक्षक श्री. विजय मुतडक (गुन्हे) व महिला पोलीस निरीक्षक श्रीमती. वैशाली रासकर (प्रशासन) यांनी सदर गुन्ह्याची गंभीर दखल घेत त्याप्रमाणे तपास पथकातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले व सूचना दिल्या. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वागळे इस्टेट पोलिस ठाण्याचे तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. फड व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक/ आंबेकर, पोलीस नाईक/ 219 बांगर, पोलीस नाईक 6650 बांगर, पोलीस नाईक/ 1887 खेडकर, पोलीस नाईक / 6417 जाधव, पोना / 739 महाले व पोलीस कॉन्स्टेबल /8009 सूर्यवंशी यांनी दोन तासांमध्ये रिक्षा चोराचा शोध घेऊन त्यास अटक केली आहे. तरी वरील तपास पथकातील अधिकारी तसेच अंमलदारांनी अतिशय कमी वेळेत आरोपीत नामे संजय दत्तराव मंचेकर वय 25 वर्षे, राहणार- घाटकोपर मुंबई, यास अटक करून चोरीस गेलेल्या १,६०,०००/- रुपये किमतीच्या दोन रिक्षा रिकव्हर केल्या आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक / आंबेकर हे करीत आहेत. तरी सर्वांनी खूप उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे सर्वांना शुभेच्छा. 💐💐💐💐💐