जम्बो रुग्णालयात 50 ऑक्सिजन बेड तयार, नवीन करोना रुग्णांना प्रवेश सुरू

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*जम्बो रुग्णालयात 50 ऑक्सिजन बेड तयार, नवीन करोना रुग्णांना प्रवेश सुरू*


- *11 आणि 15 केएल लिक्विड ऑक्सिजनच्या दोन टाक्या सज्ज*


- *शुक्रवारपर्यंत 85 बेड तयार होणार*


- *'जम्बो'मध्ये पाच दिवसात 66 रुग्ण बरे झाले!*


पुणे : जम्बो कोविड रुग्णालयात आज 50 ऑक्सिजन बेड तयार करून कार्यान्वित करण्यात आले आहेत. याशिवाय शुक्रवारी आणखी 25 ऑक्सिजन बेड, 5 आयसीयू, तर 5 व्हेंटिलेटर बेड तयार करण्यात येणार आहेत. यामुळे शुक्रवारी संध्याकाळपर्यंत एकूण 85 बेड तयार होतील. येथे नवीन रुग्णांना प्रवेश देण्यास आज (गुरुवारी) सुरुवात करण्यात आली असून, आज चार रुग्णांना प्रवेश देण्यात आला. तसेच, ‘जम्बो’मध्ये उपचार घेऊन बरे झालेल्या 14 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले, अशी माहिती अतिरिक्त मनपा आयुक्त व जम्बो सेंटरच्या कार्यकारी अध्यक्षा रुबल अग्रवाल यांनी दिली. 


जम्बो कोविड रुग्णालयाची यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मंगळवारी (8 सप्टेंबर) पुणे महापालिका प्रशासनाच्या वतीने महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांनी येथे भेट देऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी रुबल अग्रवाल ऑक्सिजन बेडची संख्या व रुग्णालयाची एकूण क्षमता वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे 50 ऑक्सिजन बेड आज कार्यान्वित करण्यात आले. मागील आठवड्यात 2 सप्टेंबरपासून नवीन रुग्णांना प्रवेश देण्यात आला नव्हता. मात्र, आता प्रवेश सुरू करण्यात आले आहेत.


त्याचबरोबर रुबल अग्रवाल यांनी सांगितले की, “या 50 बेड व्यतिरिक्त जम्बो कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडसाठी आवश्यक ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन येथे लिक्विड ऑक्सिजनच्या दोन टाक्या तयार ठेवण्यात आल्या आहेत. एक 11 केएल आणि दुसरी 15 केएल ऑक्सिजनचा साठा असणारी अशा दोन टाक्या सुसज्ज करण्यात आली आहे.” 


जम्बोमध्ये बरे झालेल्या 20 रुग्णांना बुधवारी, तर 14 रुग्णांना गुरुवारी घरी सोडण्यात आले. ‘जम्बो’मध्ये उपचार घेऊन आतापर्यंत एकूण 66 रुग्ण बरे झाले आहेत.


उपचार घेत असलेल्या रुग्णांशी टॅब्लेट फोनद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संपर्क करण्याची सुविधेचा लाभ नातेवाईक घेत आहेत. दिवसातून एकदा एका नातेवाईकाला रुग्णाशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधता येतो. या सुविधेबद्दल नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
मा श्री. विनय सुदामपंत शेलुर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांना कोविड १९ महायोद्धा 2020 (KOVID 19 WARRIORS 2020 ) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Image
मा.श्री.शादाब मुलाणी युवासेना पुणे यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी 
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन