कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक कायद्या अंतर्गत शिवाजीनगर पुणे 5 येथील विदेशी मद्य वाईन चे दुकान सील करण्यात आले.*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


कृपया प्रसिद्धीसाठी


*कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक कायद्या अंतर्गत शिवाजीनगर पुणे 5 येथील विदेशी मद्य वाईन चे दुकान सील करण्यात आले.*


*पुणे :-* कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता मा. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी निर्गमित केलेल्या आदेशान्वये पुणे शहरातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील जीवनावश्यक सेवा , जीवनावश्यक सेवा व्यतिरिक्त दुकाने, मार्केट सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत लॉक डाउन काळात टप्पे निहाय सुरू करण्यात आलेली आहेत. तसेच दुकान व मार्केटमध्ये येत असलेल्या नागरिकांनी मुख पट्टी (फेस मास्क) वापरणे सामाजिक अंतर ठेवणे, वेळोवेळी परिसर सॅनिटाइज करणे इत्यादी बंधनकारक करण्यात आले आहे .


वेळोवेळी निर्गमित आदेशाचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येत असून शिवाजी नगर मधील विदेशी मद्य


वाइनच्या दुकानात येणाऱ्या नागरिकांनी मुख पट्टी (फेस मास्क) न वापरणे, सामाजिक अंतर न ठेवणे व दुकान


      मालकाने दुकान व आजूबाजूचा परिसर सैनिटाइज़ न करता आदेशाचे उल्लंघन केले आहे.


त्यामुळे या दुकानावर अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई करून सदरचे दुकान सील करण्यात आले. याप्रसंगी अतिक्रमण विभागाचे मा, उपायुक्त माधव जगताप यांचे नियंत्रणाखाली सदरची कारवाई करण्यात आली.


      माहिती व जनसंपर्क अधिकारी


पुणे महानगरपालिका