छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


*छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर*


 


        पुणे, दि. 9: भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दिनांक 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी आयोगाच्या निर्देशांनुसार करण्यात येणार आहे.


   छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचे सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.


  *पुर्व - पुनरिक्षण उपक्रम*:- 


  (1) 1. मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण करणे, 2. दुबार/समान नोंदी व छायाचित्र मतदार ओळखपत्र 


संदर्भातील त्रुटी दुर करणे 3. विभाग/भाग पुन्हा तयार करणे आणि मतदानाच्या क्षेत्राच्या/भागांच्या सीमेच्या पुनर्रचनेचे प्रस्ताव अंतिम करणे आणि मतदान केंद्रांची यादी मंजूर करणे- दि. 30 सप्टेंबर 2020 (बुधवार) ते दि. 31 ऑक्टोबर 2020 (शनिवार).


 (2) 1. नमुना 1 ते 8 तयार करणे. 2. पुरवणी आणि एकत्रिकृत प्रारूप यादी तयार करणे- दि. 1 नोव्हेंबर 2020 (रविवार) ते दि. 15 नोव्हेंबर 2020 (रविवार) 


  *पुनरिक्षण उपक्रम*- 


 (3) एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करणे- दि. 16 नोव्हेंबर 2020 (सोमवार)


  (4) दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी - दि. 16 नोव्हेंबर 2020 (सोमवार) ते दि. 15 डिसेंबर 2020 (मंगळवार)


 (5) विशेष मोहिमांचा कालावधी - दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी निश्चित केलेले दोन शनिवार आणि रविवार.


  (6) दावे व हरकती निकालात काढणे- दि. 5 जानेवारी 2021 (मंगळवार) पर्यंत.


  (7) 1. प्रारूप मतदार यादीच्या मापदंडांची तपासणी करणे आणि मतदार यादीच्या अंतिम प्रसिध्दी करिता आयोगाची परवानगी घेणे. 


2. डेटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी याद्यांची छपाई करणे- दि. 14 जानेवारी 2021 (गुरूवार) पर्यंत.


  (8) मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे -दि. 15 जानेवारी 2021 (शुक्रवार).


  पुनरिक्षण कार्यक्रम हा दि. 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम असणार आहे. हा कार्यक्रम या वेळापत्रकानुसार व मतदारयादी नियम पुस्तिका, 2016 मधील तरतुदींनुसार तसेच त्यानंतर त्यासंदर्भात देण्यात आलेल्या विविध सुचनांच्या अनुषंगाने राबविण्यात येणार आहे, असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी कळविले आहे.


0000