कोथरूड क्षेत्रिय कार्यालय  अंतर्गत जन्म - मृत्यू विभागाचे अक्षरश: उंबरे झिजवावे लागत असल्याने,नागरिकांना सोसावा लागतोय नाहक त्रास

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*



*पुणे :-* नागरिकांना ठराविक मुदतीत आणि गतिमानतेने जन्म आणि मृत्यूचे दाखले मिळावे, म्हणून पालिकेकडून नागरिक नोंदणी प्रणाली (सीआरएस) पालिकेने सुरू केली आहे. मात्र, या प्रणालीतील त्रुटी आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे नागरिकांना दाखल्यासाठी जन्म-मृत्यू कार्यालयाच्या अक्षरश: उंबरे झिजवावे लागत आहेत.


ही परिस्थिती दूर करण्यासाठी सक्षम पर्यायी व्यवस्था करून जन्म आणि मृत्यूचा दाखला त्वरित मिळावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वतीने


करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस गिरीश गुरनानी म्हणाले की, या कार्यालयातील अनेक कर्मचारी हे कंत्राटी स्वरूपात नेमलेले होते. त्यांचे कंत्राट संपल्याने त्यांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात आले नाही.


परिणामी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेले हे जन्म-मृत्यूचे दाखले वेळेत मिळत नाहीत. परिणामी, नागरिकांना हे दाखले मिळण्यासाठी अक्षरशः कार्यालयाला खेटे घालावे लागत असून दुसरीकडे हे कर्मचाऱ्यांची रोजगाराअभावी उपजीविका धोक्यात