पुणे प्रवाह न्युज पोर्टल
ग्लॅमरस करिअर'ची संधी देणारी 'फॅशन इंडस्ट्री'
पुणे :- भारतीय संस्कृतीत पेहरावाला फार महत्व आहे. विविध प्रकारच्या पेहरावातून ही संस्कृती समृद्ध होत गेली आहे. फॅशन डिझाईन ही पोशाख, पेहराव आणि जीवशैलीच्या साहित्य रचनेला वाहिलेली एक कला आहे. ही कला सांस्कृतिक आणि सामाजिक प्रभावाखाली असून, स्थलकालानुसार विकसीत होत गेली आहे. प्राचीन भारतीय राजेशाही परंपरेतून ही फॅशन डिझाईनची उत्पादने आल्याचे आपल्याला पाहायला मिळते. आज हे क्षेत्र अधिकच व्यापक होत गेले आहे. या क्षेत्रात करिअर करून आपल्यातील सर्जनशीलता आणि प्रतिभा दाखवण्याची संधी आपल्याला आहे.
फॅशन डिझाईनिंग आजच्या काळात सर्वात आकर्षक, मोहक, भावणारा आणि उत्सुकता वाढवणारा असा करिअरचा पर्याय आहे. जर आपल्याकडे सर्जनशीलता, शैलीची जाण आणि कल्पकता असेल तर हे क्षेत्र आपली वाट पाहत आहे. एका बाजूला लोकांच्या सर्जनात्मक आणि भौतिक गरजा भागविण्याचे, तर दुसऱ्या बाजूला प्रतिभावान लोकांना ग्लॅमर, यश, प्रसिद्धी आणि चांगले उत्पन्न देण्याची क्षमता फॅशन इंडस्ट्रीमध्ये आहे.
फॅशन डिझाईनिंगमधील एक नावाजलेली संस्था म्हणजे सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी. इथे बॅचलर ऑफ सायन्स इन फॅशन डिझाईन, डिप्लोमा इन फॅशन टेक्नॉलॉजी असे दोन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. दहावी उत्तीर्ण कोणताही विद्यार्थी डिप्लोमासाठी प्रवेश घेऊ शकतो. डिप्लोमा इन फॅशन डिझाईन हा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाशी संलग्न आहे. डिप्लोमा इन फॅशन टेक्नॉलॉजी किंवा बारावी उत्तीर्ण विद्यार्थी बीएस्सीसाठी प्रवेश घेऊन शकतो. हा अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित आहे. या पाच वर्षाच्या कालावधीत विद्यार्थ्यांना फॅशन इल्लूस्ट्रेशन, पॅटर्नमेकिंग, कन्स्ट्रक्शन, कपड्यांची ओळख, फॅशन मार्केटिंग अँड कम्युनिकेशन, टेक्स्टाईल्स अँड क्वालिटी अशुरन्स, फॅशन रिटेलिंग, सर्फेस ऑर्नामेंटेशन, कॅड, हिस्टरी ऑफ फॅशन, ट्रॅडिशनल टेक्स्टाईल, ड्रेपिंग आदी गोष्टी शिकता येणार आहेत.
अतिशय हुशार आणि सर्जनशील असलेल्या ही नवीन युवापिढी त्यांच्यातील सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी आणि फॅशन जगतात आपले स्थान निर्माण करण्यासाठी फॅशन इन्स्टियूटमध्ये प्रवेश घेण्यात रुची दाखवत आहेत. या युवकांमध्ये अतिशय नाविन्यपूर्ण आणि प्रतिभाशैली असल्याने ट्रेंडस अनुकरण करण्यापेक्षा ट्रेंड निर्माण करणारे बनत आहेत. अनेक नवीन डिझायनर्स अनुभवासाठी करिअर म्हणून काम करतात. या क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी आहेत. परंतु, अनेकजण या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी त्यांच्यातील सर्जनशीलता आणि व्यवस्थापकीय कौशल्य यांचा मेळ घालणे आवश्यक ठरते. फॅशन डिझाईनिंग हे करिअर हे केवळ ग्लॅमरस लोकांना भेटणे किंवा श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्तींशी संवाद करण्यापुरतेच मर्यादित नाही, तर जीवनशैलीच्या बाबतीत काटेकोर असलेल्या लोकांना आपल्या कल्पकतेतून समाधान देण्याचे काम करते. फॅशन डिझाइनमधील करिअर शैलीची भावना बाळगण्याचा विचार करणार्या मनाच्या सर्जनशील प्रतिभास प्रोत्साहित करते. या क्षेत्रातील महत्वाचा भाग आहे तो म्हणजे, कपड्यांचे डिझाईन, स्केचिंग, कापड कापणी, तुकड्याचे एकत्रित शिवणकाम आणि अंतिमतः विक्री आदींचा समावेश आहे. विविध शैलीची लोकप्रियता व विपणन आणि उत्पादनांना फॅशन शो आणि फॅशन लिखाणाच्या माध्यमातून होते. या दिवसांत फॅशनचे वाढत असलेले महत्व, कपड्यांत वैविध्य आणि स्थानिक बाजारात उत्पादनांची उपलब्धी यामुळे फॅशन डिझायनरला आणखीनच समृद्ध होणे शक्य होत आहे. आपल्या विशिष्ट भरतकाम पद्धती, सुंदर आणि श्रीमंत शिल्प, हातमाग फॅब्रिक्स, देहाती पोत आणि चमकदार रंगांसह जागतिक बाजारपेठेतील प्रमुख स्थान मिळवण्याचा फायदा भारत घेत आहे. भारतीय फॅशन डिझायनर्सनी भारतीय वसाहतींसाठी जागतिक बाजारपेठ तयार करण्यात मोलाचे योगदान दिले आहे.
काही फॅशन डिझायनर्स फ्रीलांस म्हणून काम करत आहेत. काहीजण व्यक्तिगत पातळीवर काम करत आहेत. किंवा डिझाइनर कपडे बनवून दुकाने किंवा कपडे उत्पादकांना पुरवले जातात. काही लोक फॅशन कंपनीसाठी काम करतात, तर काहीजण कंपनीचे डिझाईन करतात. काहीजण स्वतःचे फॅशन दुकान काढून त्यांच्या कल्पक आणि सुंदर डिझाईनची विक्री करतात. काही लोक निर्यात कंपन्यात, कापड गिरण्यात, बुटीक्समध्ये, कपड्यांच्या दुकानात, लेदर कंपन्यात पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर काम करतात.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील करिअरच्या संधी : फॅशन डिझाइनर, फॅशन कोऑर्डिनेटर, फॅशन इलस्ट्रेटर, फॅब्रिक टेक्नॉलॉजिस्ट, फॅशन कन्सल्टन्ट, फॅशन जर्नालिस्ट, फ्रीलान्स डिझाइनर, फॅशन स्टायलिस्ट, प्राध्यापक, बुटीक ओनर, कॉस्ट्यूम डिझाइनर, फॅशन इव्हेन्ट कोऑर्डिनेटर, फॅशन कोरिओग्राफर, फॅशन कटर, ब्रँड स्टोअर मॅनेजर, फॅशन फोटोग्राफर, फॅशन एडिटर, व्हिज्युअल मर्चंटायझर, ज्वेलरी डिझायनर, अपरेल डिझाइनर, ऍक्सेसरीज डिझाइनर, सेल्स असोसिएट, पब्लिक रिलेशन्स स्पेशालिस्ट, इन्व्हेंटरी प्लॅनर, रिटेल बायर, ग्राफिक डिझाइनर, टेक्स्टाईल डिझाइनर, क्रिएटिव्ह डिझाइनर, क्वालिटी अश्युअरन्स मॅनेजर आदी पदांवर काम करण्याची संधी उपलब्ध आहे.
सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटने लंडन अकॅडमी ऑफ प्रोफेशनल ट्रेनिंग (एलएपीटी) यांच्याशी सामंजस्य करार केला आहे. त्याद्वारे गेली १५ वर्षे प्रमाणपत्र दिले जाते. लंडन अकॅडमी ऑफ प्रोफेशनल ट्रेनिंग ही जागतिक स्तरावर नामांकित संस्था असून, १८० देशांत कार्यरत आहे. ही एक स्वतंत्र संस्था आहे, जी स्टँडर्ड्स आणि गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी सल्ला व मार्गदर्शन करते. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट एक दर्जेदार आणि नामांकित संस्था असून, अनेक प्रसिद्ध संस्थांशी संलग्नित आहे. डिप्लोमाचे प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी सूर्यदत्ताने 'एलएपीटी'शी करार केला आहे.
सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये फॅशन डिझाईन अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी www.sgisift.org / www.sgisivas.org या संकेतस्थळांना भेट द्यावी. 'अप्लाय' या बटणवर क्लिक करून अर्ज भरावा. येथे प्रवेशाची पात्रता पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. अधिक माहितीसाठी ०२०-२४३२५८३० किंवा ९७६६२६३१३२ किंवा ९७६३२६६८२९ या नंबरवर किंवा renuka.ghospurkar@suryadatta.edu.in या इमेलवर संपर्क साधावा.