*ए.टी.एम सेंटरमध्ये ग्राहकांना मदत करण्याचे बहाण्याने हातचलाखीने कार्ड* *बदलुन फसवणुक करणारे गुन्हेगार जेरबंद

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


*ए.टी.एम सेंटरमध्ये ग्राहकांना मदत करण्याचे बहाण्याने हातचलाखीने कार्ड*


*बदलुन फसवणुक करणारे गुन्हेगार जेरबंद


*विरार :-* पोलीस ठाणे हददीत ए.टी.एम सेंटरमध्ये ग्राहकांना मदत करण्याचे बहाण्याने हातचलाखीने कार्ड बदलुन फसवणुकीचे गुन्हयांचे घटनांना आळा आलण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.दत्तात्रय शिंदे, यांचे सुचने प्रमाणे श्री.विजयकांत सागर, अप्पर पोलीस अधीक्षक वसई, श्रीमती.रेणुका बागडे, उपथिभागिय पोलीस अधिकारी, विरार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाणे नेमणुकीतील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे एक पथक तयार करुन गुप्त बातमीदाराचे मदतीने आरोपीत १)रोहीत मृदुल कुमार पांडे वय २८ वर्षे रा- रुम नं ०३, यादव नगर, पंकज यादव चाळ, संतोषभुवन नालासोपारा पुर्व मुळ राह- बडरखुर्द गाव, पोस्ट- हरीया, जिल्हा बस्ती राज्य उत्तरप्रदेश २)प्रदयुम राधेश्याम यादव वय २१ वर्षे रा रुमनं ०५, सिताराम हॉटेल, वलई पाडा, संतोषभुवन नालासोपारा पुर्व मुळ राह- जौनपुर, करीकत, परमानंदपुर, उत्तरप्रदेश यांना दिनांक १६/०९/२०२० रोजी १८.५६ वा. अटक करण्यात आली आहे. आरोपीत यांनी ए.टी.एमचे सहाय्याने काही वस्तु खरेदी केल्या व रोख रक्कम काढुण घेतली आहे. त्याप्रमाणे आरोपीत यांचेकडुन १,५१,६००/- रु कि.चे टीव्ही, एसी, होमथेटर, सोन्याची अंगठी, व कॅमेरा हे जप्तकेले आहे व तसेच ८३,०००/- रोख रक्कम हस्तगत केली आहे. आरोपीत यांचेकडून विरार व माणिकपुर पोलीस ठाण्यातील खालील गुन्हे उघडकीस आणले आहे. सदर गुन्हे उघडकीस


आणनेकामी सायबर सेल पालघर येथील पोलीस निरीक्षक /सिध्देश शिंदे व पोलीस /दुर्गेष्ट, पोलीस /गव्हाणे,


पोलिस /चव्हाण, पोलीस /पाटील यांनी मदत केलेली आहे.