पुणे प्रवाह न्युज पोर्टल
बँक ऑफ महाराष्ट्र ला “टॉप इम्प्रुव्हर्स” या मानांकनात प्रथम स्थान
पुणे, 09 सप्टेंबर, 2020 : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये अग्रगण्य असणा-या बँक ऑफ महाराष्ट्रला “टॉप इम्प्रुव्हर्स” या मानांकनामधे सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांमधे विजेता (प्रथम क्रमांक) घोषित करण्यात आले आहे.
EASE 2.0 पारितोषिक विजेते या इंडियन बँक्स असोसिएशनने आयोजित केलेल्या दिमाखदार समारंभास माननीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन व श्री देबाशीष पांडा, सचिव, वित्तसेवा विभाग यांची सन्माननीय उपस्थिति लाभली. दि.9 सप्टेंबर, 2020 रोजी व्हिडियो कॉन्फरन्स द्वारा हा समारंभ झाला. हा सन्मान मिळणे विशिष्ठ आहे आणि सर्व बँक कर्मचा-यांच्या सांघिक प्रयत्नांचे यात प्रतिबिंब आहे. EASE म्हणजे Enhanced Access & Service Excellence (संपर्काची सहजता आणि उत्कृष्ट सेवा).
ही बाब लक्षणीय आहे की “टॉप इम्प्रुव्हर्स अग्रगण्य स्पर्धक” या गटात बँक ऑफ महाराष्ट्रला द्वितीय क्रमांक मिळाला होता. EASE 3.0 चे अनावरण दि.26 फेब्रुवारी, 2020 रोजी झालेल्या समारंभात हा पुरस्कार मिळाला. याशिवाय कामगिरीच्या निकषावर 2018 या वर्षासाठी देखील बँक ऑफ महाराष्ट्रला EASE पारितोषिक मिळाले होते.