पुणे प्रवाह न्युज पोर्टल
उत्तर प्रदेश्यातील आझमगड जिल्ह्यातील बासगाव येथील दलित सरपंच पप्पू राम उर्फ सत्यमेव जयते यांची अज्ञातांणी गोळया घालून हत्या केली. पीडित परिवाराचे सांत्वन करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे ऊर्जा मंत्री . ना. डॉ. नितीन राऊत गेले असता उत्तर प्रदेश सरकारने त्यांना अटकाव केला, त्यांना डिटेन केले, या घटनेचा निषेध व स्व. पप्पू राम यांच्या परिवारास न्याय मिळण्यासाठी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष माननीय विजयजी अंभोरे यांच्या नेतृत्वात राज्यभर निदर्शने करण्यात आली. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली, व महामहिम राष्ट्रपतिनं अश्या जातीवादी उत्तर प्रदेश योगी सरकार बरखास्त करावी अशे निवेदन शिलार रतनगिरी अध्यक्ष पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग यांच्या हस्ते पुणे जिल्हाधिकारींना देण्यात आले.
या प्रसंगी राजाराम बल्लाळ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग, उपाध्याय पुणे शहर बळीराम थोरात, अरविंद रोकडे, सरचिटणीस साहेबराव कानगरे विशाल वाघेला व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.