दुर्गम भागातील नागरिकांना मिळाले ख-या अर्थाने स्वातंत्र्य* _स्वातंत्र्यदिनी आदिवासींच्या खांद्यावरील ओझे कमी_

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


Press Note


 


*


 


पुणे, १८ ऑगस्ट: वर्षानुवर्षे दुर्गम भागातील नागरिक आणि आदिवासी डोक्यावरून किंवा खांद्यावरून पाणी वाहून आणत असत. आजही भारतामध्ये असे अनेक ठिकाणे आहेत की जिथे नागरिकांना पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. पाण्याने भरलेली जड भांड्यांचे ओझे दुरुन वाहून आणल्यामुळे अनेक माता-भगिणींना शरिराच्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशनच्या वतीने तयार करण्यात आलेल्या मिशन परिवर्तन - निरचक्रामुळे दुर्गम भागातील नागरिकांच्या पाणी वाहतुकीचे ओझे आता हलके होत आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सणसवाडी गावामधील आदिवासी कुटुंबांना १७ निरचक्रांचे वाटप ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशन, रोस्ट्रम इंडिया सोशल ऑर्गनायझेशन आणि एक्सप्लिओ ग्रुपच्या वतीने करण्यात आले. यावेळी ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशनचे संस्थापक तन्वीर इनामदार, सहसंचालक तमन्ना इनामदार तसेच वैभव मोगरेकर, अमोल उंब्रजे, दिवाकर मोगरेकर, जावेद पठाण, बालाजी नाईक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


 


सणसवाडी ह्या गावात पाऊस पडला तरी पाणी जमिनीत मुरत नाही, वाहून जाते. अश्या वेळी विहीर/ बोअरवेलमध्ये पाणीसाठी होत नाही. त्यामुळे महिलांना घरापासून दररोज २ ते ३ किमी अंतरावरून पाणी आणावे लागते. मिशन परिवर्तन-निरचक्र मुळे या गावातील कुटुंबांना शारिरीक त्रासापासून स्वातंत्र्य मिळणार आहे. मिशन परिवर्तन-निरचक्र या उपक्रमांतर्गत आतपर्यंत २५० कुटंब आणि २२०० व्यक्तींना पाणी वाहतुकीसाठी मदत होत आहे