पुणे प्रवाह न्युज पोर्टल
अयोध्या नगरीमध्ये भव्य राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले . या सुवर्णक्षणी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अयोध्येत जाणे शक्य नसल्याने भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्ट व जय महाराष्ट्र तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जय महाराष्ट्र तरुण मंडळाचे अध्यक्ष तेजेंद्र नथुराम कोंढरे यांच्या शुभहस्ते प्रभू श्री रामांच्याच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. व यावेळी नगरसेविका सुलोचना कोंढरे यांच्याहस्ते नागरिकांना पेढे वाटण्यात आले. या वेळी सागर शिंदे , सुदाम थोरवे , निखिल जाधव व अन्य मंडळाचे क्रियाशील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .