*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
**
*मुंबई :-* हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार संजय दत्त यांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्याने, त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आहे. त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. मात्र ती चाचणी निगेटीव्ह आली आहे.
त्यामुळे संजूबाबांना सर्व साधारण वाॅर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. परंतू श्र्वास घेण्यास त्रास होत असल्याने, त्यांना ऑक्सिजन लावण्यात आले आहे.