पुष्परंगावली व दीपोत्सवाने महालक्ष्मी मंदिरात आनंदोत्सव

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


पुणे : श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल चॅरीटेबल ट्रस्टच्या श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या वतीने राम मंदिर भूमी पूजनानिमित्त महालक्ष्मी मंदिरात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फुलांची आकर्षक आरास करण्यात आली. दिव्यांच्या प्रकाशाने संपूर्ण मंदिर उजळून निघाले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंदिर बंद असल्याने भाविकांनी मंदिराबाहेरुनच हे दृश्य अनुभविले. ट्रस्टचे अध्यक्ष राजकुमार अग्रवाल आणि अमिता अग्रवाल यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.