सोन्याच्या किंमतींनी गाठला नवा उच्चांक

पुणे प्रवाह न्युज पोर्टल सोन्याच्या किंमतींनी गाठला नवा उच्चांक


 


मुंबई, ७ ऑगस्ट २०२०: गुरुवारी सोन्याचे दर १.०६% नी वाढले. सोने स्टँडर्ड २०३९.४ डॉलर प्रति औसांवर बंद झाले. सोन्याच्या किंमतीतील वाढीचे कारण म्हणजे कोरोना व्हायरसच्या दुस-या लाटेमुळे निर्माण झालेली बिकट आर्थिक स्थिती. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले की अमेरिकेने कोव्हिड-१० चा प्रभाव वाढण्याच्या संकेतांमुळे प्रोत्साहन पॅकेजची घोषणा केली. त्यामुळे सोन्याच्या किंमतींनी उच्चांक गाठला. अमेरिकी डॉलरमध्ये घसरण झाल्याने वास्तविक रिटर्नमध्ये तीव्र घसरण झाली. मार्केटमध्ये लोकांनी नॉन-यील्डच्या गोल्डन असेटच्या दिशेने गुंतवणुकीचा कल दर्शवला.


 


कच्चे तेल: डब्ल्यूटीआय क्रूडच्या किंमती गुरुवारी ०.५७% कमी होऊन त्या ४२.० डॉलर प्रति बॅरलवर बंद झाल्या. कोव्हिड-१९ केसमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे अमेरिकेत क्रूड ऑइलच्या आउटलुकवर साशंकता निर्माण झाली. कोव्हिड-१९ चा प्रभाव वाढण्याच्या शक्यतांदरम्यान अमेरिकेच्या नव्या स्टिम्युलस डीलमुळे कच्च्या तेलाच्या मागणीची शक्यता अजूनही दबावाखाली आहे. अमेरिकी डॉलर कमकुवत झाल्यामुळे अमेरिकी इन्व्हेंट्रीच्या पातळीत घसरण झाली. त्यामुळे तेलाच्या किंमतीतील घसरण मर्यादित राहिली. यासह अमेरिकी डॉलर कमकुवत झाल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण दिसून आली. यामुळे इतर देशांच्या चलनधारकांसाठी तेलाच्या किंमती कमी झाल्या.


 


दरम्यान, एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या अहवालानुसार, अमेरिकी बाजारात क्रूड ऑइल इन्व्हेंट्री पातळीचा अंदाज (३ दशलक्ष बॅरल) २०२० च्या अखेरच्या आठवड्यात वाढून ७.४ दशलक्ष बॅरलपर्यंत पोहोचला होता.


 


बेस मेटल्स: एलएमई बेस मेटलच्या किंमती गुरुवारी सकारात्मक नोटवर बंद झाल्या. अमेरिकी डॉलरचा कमकुवतपणा आणि अमेरिका,चीन आणि युरोझोनमध्ये उत्पादन-निर्मिती कामकाजात सुधारणांमुळे बेस मेटल्सच्या किंमतीना आधार मिळाला. औद्योगिक धातूंच्या किंमतीत वृद्धीमागील प्रमुख कारण म्हणजे, सर्वात मोठा धातूचा ग्राहक असलेल्या चीनमध्ये प्रचंड प्रमाणावर वाढलेली मागणी. तथापि, बेस मेटलच्या आउटलुकवर मात्र नकारात्मक संकेत दिसून आले. कारण साथीच्या व्यापक प्रभावाने उत्पन्न झालेल्या जागतिक आर्थिक स्थितींमुळे इतर देशांकडून धातूची मागणी निराशाजनक राहिली आहे.


 


तांबे: एलएमई कॉपरच्या किंमती गुरुवारी ०.२५ टक्क्यांनी कमी होऊन ६४९४.५ डॉलर प्रति टनांवर बंद झाल्या. चिली आणि पेरीसारख्या प्रमुख तांबे उत्पादकांकडून पुरवठ्यासंबंधी वाढत्या चिंतेमुळे लाल धातूंच्या किंमती कमी होत आहेत. औद्योगिक धातूंसाठीच्या मागणीच्या शक्यता कोरोना व्हायरसच्या संभाव्य दुसऱ्या लाटेवर अवलंबून आहे.


Popular posts
बंड गार्डन पाेलिस निरीक्षक मा. अमाेल काळे साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ; साहेबांना कोरोना योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले
Image
न्यू आर्या फाऊंडेशनच्यावतीने समाजाला आधार देण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन
Image
पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान- जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील
Image
💃🏻*Traditional Kanchipuram at its finest and most classic
Image
महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, काँग्रेस भवन मध्ये आज महत्वपूर्ण बैठक संपन्न...
Image