स्टेट बँकेत अधिकारी पदावर काम करण्याची संधी*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


*स्टेट बँकेत अधिकारी पदावर काम करण्याची संधी*


 


पुणे : भारतीय स्टेट बँकेतर्फे महाराष्ट्रातील योग्य पदवीधर युवक/युवतीना स्टेट बँकेत सर्कल बेस्ड ऑफिसर पदावर काम करण्याची सुवर्णसंधी बँकेने उपलब्ध करून दिली आहे. बँकेचे मुख्य महा प्रबंधक श्री दीपक कुमार लल्ला यांनी ही माहिती दिली. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२० अशी आहे.


 


महाराष्ट्रातील मराठी भाषिक उमेदवारांना महाराष्ट्रातच अधिकारी पदांवर काम करण्याची सुवर्ण संधी यामुळे उपलब्ध होत आहे. ग्रामीण बँक अथवा शेड्युल कमर्शियल बँकेमध्ये दोन वर्षाचा अनुभव असलेल्या ३० वर्षाखालील मराठी तरुणांना या पदासाठी ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो, असे दीपक कुमार यांनी सांगितले. मंडळ आधारित अधिकारी किंवा सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) असे या पदाचे नाव असून सहाय्यक प्रबंधक या श्रेणीत नियुक्तीसाठी हे अर्ज मागविण्यात येत आहेत.


 


श्री दीपक कुमार लल्ला यांनी सर्व मराठी तरुणांनी या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. या संबंधतील संपूर्ण माहितीसाठी https://www.sbi.co.in/careers  या  किंवा https://bank.sbi/careers या वेबसाईटला भेट देवून पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येऊ शकेल, असेही त्यांनी नमूद केले.