पर्यावरणपूरक फिरते विसर्जन हौद सेवेत दाखल !

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या पुणे शहरामध्ये घरच्या गणपतीचे घरीच विसर्जन करावे आणि सार्वजनिक मंडळातील गणपतीचे मांडवातच विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले, त्याला पुणेकरांनी आणि गणेशोत्सव मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ज्या नागरिकांना घरच्या गणपतीचे घरी विसर्जन करणे शक्य नाही, अशा नागरिकांसाठी आपल्या पुणे महापालिकेच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देताना फिरत्या हौदाची व्यवस्था करण्यात आली आहे. आज हे फिरते हौद क्षेत्रिय कार्यालयांकडे रवाना केले आहेत.


 


एका क्षेत्रिय कार्यालयात दोन याप्रमाणे ३० पर्यावरण पूरक गणेश विसर्जन फिरत्या हौद उपक्रमाचा आज सकाळी श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत फिरत्या हौदाचा मार्ग, वेळेचे योग्य असे नियोजन करण्यात आले आहे.


 


याप्रसंगी उपमहापौर सौ सरस्वतीताई शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष श्री हेमंत रासने, महापालिका उपायुक्त श्री ज्ञानेश्वर मोळक, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


 


#गणेशोत्सव #गणपती_बाप्पा_मोरया #Covid_19 #PuneFightsCorona