झूमकारद्वारे ‘झूमकार मोबिलिटी सर्व्हिसेस’चा शुभारंभ

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 



 


मुंबई, १० ऑगस्ट २०२०: भारतातील सर्वात मोठ्या पर्सनल मोबिलिटी प्लॅटफॉर्म झूमकारने दुचाकी, तीन चाकी, चार चाकी, ट्रक आणि बसेस या वाहनांच्या सर्व श्रेणींमध्ये सॉफ्टवेअर आधारीत प्लॅटफॉर्म सेवा प्रदान करण्यासाठी झूमकार मोबिलिटी सर्व्हिसेस (झेडएमएस) सुरू करण्याची घोषणा केली. अंतर्गत इंधनाच्या तसेच इलेक्ट्रिक वाहने या दोन्हींसाठी झेडएमएस काम करेल. ते पूर्णपणे हार्डवेअर विरहित आहे. झेडएमएसच्या लाँचिंगनंतर झूमकार आधुनिक आणि टेक स्टॅकची सुविधा देईल, जे ऑपरेटिंग खर्च कमी करणे, सुरक्षा वाढवणे, वाहनाचे उत्पन्न वाढवणे तसेच ग्राहकांची संख्या वाढवणे यावर भर देईल.


 


झेडएमएसचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील खासगी मालकीची ड्रायव्हर स्कोरिंग मेकॅनिझम. हे एक एआय पॉवर्ड मेकॅनिझम असून त्यात मशीन लर्निंग क्षमता आहे. याद्वारे वाहनाच्या आरोग्याच्या सद्यस्थितीसह ग्राहकाच्या रिअल-टाइम ड्रायव्हिंग वर्तनावरही लक्ष ठेवता येते. ड्रायव्हिंगचा दर्जा सुधारण्यासाठी ड्रायव्हर स्कोअर वेगाने सूचना प्रदान करतो. त्यानंतर एकत्रिकृत सॉफ्टवेअर सोल्यूशन ०-१०० च्या स्केलवर ड्रायव्हरला रेटिंग करते. ड्रायव्हरच्या कामगिरीची पातळी वेळोवेळी दर्शवण्यासाठी मदत करते. एकंदरीतच झेडएमएस ड्रायव्हर स्कोअरिंग सिस्टिम आणि त्यासंबंधित वर्तणूक सुधारणेच्या यंत्रणेद्वारे मासिक ऑपरेटिंग खर्च २५ ते ३० टक्के वाचवते.


 


झूमकारचे सीईओ आणि सहसंस्थापक ग्रेग मोरान म्हणाले, “ साथीच्या आजारामुळे सध्या जागगतिक स्तरावर मोबिलिटी क्षेत्र हे मोठ्या परिवर्तनशील टप्प्यातून जात आहे. त्यामुळे झूमकारमध्ये आम्ही व्यापक मोबिलिटी व्हिजनच्या दुस-या टप्प्याची हीच योग्य वेळ आहे हे मानतो. जी नवीन उत्पादनावर आधारीत सॉफ्टवेअर सोल्यूशनच्या वापराद्वारे संबंधित प्रणालीत मोठ्या प्रमाणावर कार्यक्षमता वाढवून देऊ शकते. झेडएमएससह झूमकारने ओईएम आणि ऑपरेटर्ससाठी वन-स्टॉप शॉप मोबिलिटी ऑफर दिली आहे. ज्याद्वारे ऑपरेटिंग खर्च कमी करण्यास मदत होईल. तसेच वाहन आणि ग्राहक या दोन्ही पातळीवर कमाईच्या संधीत अर्थपूर्ण वाढ होईल.”


Popular posts
राम उत्तम गालफाडे मा. पोलीस अधिकारी यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी
Image
जनशक्ती विकास संघाच्या पश्चिम महाराष्ट्र कोअर कमिटी अध्यक्षपदी छाया भोसले यांची नियुक्ती
Image
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट पुणे यांच्या वतीने २०० PPE किट आणि ४०० लिटर सॅनिटाइजर ससून हॉस्पिटलला सुपूर्त 
Image
४४.६% भारतीय विद्यार्थ्यांची ‘स्कूल फ्रॉम होम’ पर्यायास पसंती: ब्रेनली
Image
माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक कै. श्री दत्ता (काका) साने वय वर्षे ४७ यांचे दुःखद निधन झाले
Image