पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे अवाहन*
पुणे दि.२४:- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील जिल्ह्या करीता २०% बीज भांडवल योजनेचे ६० व थेट कर्ज योजनेचे १०० भौतिक उद्दिष्टव प्राप्त झाले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकाने दिली आहे.
२०% बीज भांडवल योजना ही राष्ट्रीयकृत बँकांमार्फत राबविली जाते. यासाठी प्रकल्प मर्यादा ५ लाख आहे. यात महामंडळाचा हिस्सा २०% व बँकेचा हिस्सा ७५% असून लाभार्थीचा सहभाग ५% आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी ५ वर्षे आहे. अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्ष व संपूर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असावे. थेट कर्ज योजना महामंडळामार्फत राबिवली जाते. त्याची मर्यादा एक लाख आहे. या योजनेत नियमित कर्ज फेड़ करणान्यांना व्याज आकारले जात नाही थकीत राहिल्यास ४% व्याज आकारले जाते. अर्जदाराचे वय १८ ते ५५ वर्ष आणि सिबील क्रेडीट स्कोर किमान ५०० इतका असावा. संपूर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख पर्यंत असावे शासनाच्या कौशल्य विकासामार्फत तसेच शासकीय/ निमशासकीय संस्था मधून तांत्रिक प्रशिक्षण घेतले त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. अर्जासाठी व अधिक माहितीसाठी ओ.बी.सी. महामंडळ जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा. जिल्हा कार्यालयाचा पत्ता व फोन नंबर पुढीलप्रमाणे पता- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इमारत क्र बी, स नं.१०४ /१०५, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, विश्रांतवाडी, येरवडा, पुणे-४११००६ फोन-०२०-२९५२३०५९
००००