अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक मुख्यालय (सामाजिक वनीकरण), पुणे या पदी  श्री. विवेक खांडेकर यांची पदोन्नतीने पदस्थापना

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक मुख्यालय (सामाजिक वनीकरण), पुणे या पदी 


श्री. विवेक खांडेकर यांची पदोन्नतीने पदस्थापना


 


पुणे दि.13 : - मुख्य वनसंरक्षक (प्रा.), पुणे या पदावर कार्यरत राहीलेले भारतीय वनसेवेचे सन १९९५ च्या बॅचचे अधिकारी श्री.विवेक खांडेकर यांची अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, मुख्यालय (सामाजिक वनीकरण), पुणे या पदावर पदोन्नतीने पदस्थापना झाली आहे. त्यांच्या पदोन्नतीने रिक्त झालेल्या मुख्य वनसंरक्षक (प्रा.), पुणे या पदी भारतीय वनसेवेचे सन २००२ च्या बॅचचे अधिकारी सह सचिव, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर कार्यरत राहीलेले श्री.एस.डी. दोडल यांची पदोन्नतीने पदस्थापना झाली आहे. वनक्षेत्रावरील अतिक्रमण निर्मूलनाच्या महत्वपूर्ण कामाबरोबरच पंढरपूर येथील तुळशी वृंदावन उद्यान, वारजे येथील नागरी वन उद्यान तसेच भांबुर्डा वन उद्यान उभारणी, माणिकडोह बिबटया निवारण केंद्राची क्षमता वाढ व सुधारणा अशी नाविन्यपूर्ण कामे श्री. विवेक खांडेकर यांच्या मुख्य वनसंरक्षक (प्रा.), पुणे या पदावरील कार्यकाळात झाली.  


 दि.१२/०८/२०२० रोजी श्री. एन. वासुदेवन, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली वनभवन, पुणे येथे झालेल्या समारंभात वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचेकडून श्री. विवेक खांडेकर यांना निरोप देण्यात आला व श्री. एस. डी. दोडल यांचे स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे उप वनसंरक्षक (मानव व्यवस्थापन), नागपूर या पदी बदलीने पदस्थापना झालेल्या उप वनसंरक्षक (प्रा.), पुणे श्रीमती ए. श्रीलक्ष्मी तसेच उप वनसंरक्षक (कार्य आयोजना), कोल्हापूर या पदी पदस्थापना झालेल्या श्री. व्ही. डी. सूर्यवंशी, विभागीय वन अधिकारी यांनाही या प्रसंगी ‍निरोप देण्यात आला.


     0 0 0 0