बँकिंग आणि फार्मा क्षेत्राची कमकुवत कामगिरी  ~ शेअर बाजारात किरकोळ घसरण ~

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 मुंबई, १३ ऑगस्ट २०२०: भारतीय निर्देशांकांनी आज सुरुवातीचा नफा गमावला आणि सलग दुस-या दिवशी किरकोळ घसरण अनुभवली. निफ्टी ०.०७% किंवा ७.९५ अंकांनी खाली घसरला व ११,३००.४५ वर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सने ०.१५% किंवा ५९.१४ अंकांची घसरण घेतली व ३८,३१०.४९ अंकांवर स्थिरावला.


 


एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आज जवळपास ११२८ शेअर्स घसरले, १५६४ शेअर्सनी वृद्धी घेतली तर १३६ शेअर्स स्थिर राहिले. आयशर मोटर्स (२.०६%), सन फार्मा (२.१०%), भारती एअरटेल (२.०४%), एनटीपीसी (१.५८%) आणि एचडीएफसी लाइफ (१.५०) हे निफ्टीवरील टॉप लूझर्स ठरले. तर टाटा मोटर्स (४.५९%), हिंडाल्को (४.२१%), एलअँडटी (४.३९%), टायटन कंपनी (३.९२%) आणि भारती इन्फ्राटेल (३.७२%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. बँकिंग आणि फार्मा क्षेत्र वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी सकारात्मक व्यापार केला. बीएसई मिडकॅप १.५९% नी तर बीएसई स्मॉलकॅप ०.७६% नी वाढला.


 


लेमन ट्री हॉटेल्स लिमिटेड: कंपनीने जूनच्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा जास्त नफ्याची नोंद केली. परिणामी त्यांच्या शेअर्समध्ये ९.८६% ची वाढ झाली व त्यांनी ३२३० रुपयांवर व्यापार केला.


 


शॉपर्स स्टॉप लिमिटेड: या रिटेल चेनने वार्षिक निव्वळ तोटा १२०.३ कोटी रुपयांचा नोंदवला. तर महसूलातही ९३.६% ची घट दर्शवली. तरीही कंपनीचे स्टॉक्स ६.४०% नी वाढले व त्यांनी १७५.३० रुपयांवर व्यापार केला.


 


अरबिंदो फार्मा लिमिटेड: २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीची कमाई चांगली झाली. कंपनीचे स्टॉक्स ५.६३% नी घसरले व त्यांनी ८८१.६० रुपयांवर व्यापार केला. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा २२.८% नी वाढला तर पहिल्या तिमाहीतील महसूल ८.८% नी वाढला.


 


कमिन्स इंडिया लिमिटेड: कंपीनीने २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ६५% ची घट नोंदवली तर देशांतर्गत विक्रीत ६४% ची घसरण झाल्याचे दर्शवले. तरीही कंपनीचे स्टॉक्स ३.३०% नी वाढले व त्यांनी ४३७.०० रुपयांवर व्यापार केला.


 


डीबी कॉर्प लिमिटेड: २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात ६५.३% घसरण झाली तसेच ४८ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला. तरीही कंपनीच्या शेअर्सनी उच्चांकी व्यापार केला. कंपनीचे स्टॉक्स ३.०४% नी वाढले व त्यांनी ८१.२५ रुपयांवर व्यापार केला.


 


भारतीय रुपया: भारतीय रुपयाने देशांतर्गत इक्विटी बाजारातील अस्थिरतेमुळे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत आजच्या व्यापारी सत्रात ७४.८३ रुपयांचे मूल्य कमावले.


 


जागतिक बाजार: कोव्हिड-१९ च्या रुग्णांमध्ये सतत वाढ आणि अमेरिकेतील महागाईत वाढ झाल्यामुळे आशियाई स्टॉक्समध्ये आजच्या व्यापारी सत्रात वृद्धी दिसून आली. परिणामी गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली. नॅसडॅक २.१३% , निक्केई २२५ चे शेअर्स १.७८% नी वाढले. तर हँगसेंगचे शेअर्स ०.०५% नी घसरले. युरोपियन मार्केटमध्ये घसरणीचा व्यापार दिसून आला. एफटीएसई एमआयबीचे शेअर्स ०.१६% नी घसरले तर एफटीएसई १०० चे शेअर्स १.११% नी घटले.


Popular posts
बंड गार्डन पाेलिस निरीक्षक मा. अमाेल काळे साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ; साहेबांना कोरोना योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले
Image
न्यू आर्या फाऊंडेशनच्यावतीने समाजाला आधार देण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन
Image
पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान- जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील
Image
💃🏻*Traditional Kanchipuram at its finest and most classic
Image
महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, काँग्रेस भवन मध्ये आज महत्वपूर्ण बैठक संपन्न...
Image