खजिना विहीर मंडळांच्या 'सामाजिक उत्सवाला' प्रारंभ- दहीहंडी, गणेशोत्सवाचा खर्च सामाजिक उपक्रमांना ; सदाशिव पेठेत ५ हजार मास्क व सॅनिटायझरच्या वाटपाला सुरुवात 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


  


पुणे : गणेशोत्सव व दहीहंडीसारखे सार्वजनिक उत्सव यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठया प्रमाणात साजरे न करता सदाशिव पेठेतील खजिना विहीर तरुण मंडळ सामाजिक उत्सव साजरा करीत आहे. सदाशिव पेठेत ५ हजार मास्क व सॅनिटायझर वाटपाला सुरुवात करुन या उत्सवाचा प्रारंभ मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला.


 


सदाशिव पेठेतील खजिना विहीर चौकातील विठ्ठल मंदिरात प्रातिनिधीक स्वरुपात मास्क व सॅनिटायझर परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्या हस्ते नागरिकांना देण्यात आले. उत्सवसमितीचे अध्यक्ष ओम सुरेश कासार, आशिष कोकाटे यांनी उपक्रमाचे आयोजन केले. 


 


खडक पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, डी.वाय.एस.पी. योगेश फडतरे, पोलीस कर्मचारी सोमनाथ ढगे, निता रजपूत, श्री कासार, विनोद लोखंडे, स्वप्निल शिर्के, भरत पवार, पप्पू गोरे, विशाल लोखंडे, सौरभ मेथे, ओंकार बनसोडे, निखिल साळवी आदी यावेळी उपस्थित होते. 


 


ओम कासार म्हणाले, सदाशिव पेठेत मास्क, सॅनिटायझर वाटपासोबतच बुधवार पेठेतील देवदासी महिलांना एक वेळचे जेवण देखील देण्यात आले. उत्सवाच्या काळातील अनावश्यक खर्च टाळून यंदा सामाजिक उत्सव साजरा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यामुळे या प्रकारचे अनेक सामाजिक उपक्रम गणेशोत्सवात देखील आयोजित करण्यात येणार आहेत.


 


* फोटो ओळ : सदाशिव पेठेतील खजिना विहीर तरुण मंडळातर्फे सदाशिव पेठेत ५ हजार मास्क व सॅनिटायझर वाटपाला सुरुवात करुन सामाजिक उत्सवाचा प्रारंभ केला. यावेळी परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे उपस्थित होत्या.


Popular posts
राम उत्तम गालफाडे मा. पोलीस अधिकारी यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी
Image
जनशक्ती विकास संघाच्या पश्चिम महाराष्ट्र कोअर कमिटी अध्यक्षपदी छाया भोसले यांची नियुक्ती
Image
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट पुणे यांच्या वतीने २०० PPE किट आणि ४०० लिटर सॅनिटाइजर ससून हॉस्पिटलला सुपूर्त 
Image
४४.६% भारतीय विद्यार्थ्यांची ‘स्कूल फ्रॉम होम’ पर्यायास पसंती: ब्रेनली
Image
माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक कै. श्री दत्ता (काका) साने वय वर्षे ४७ यांचे दुःखद निधन झाले
Image