आज दि. १६.०८.२०२० रोजी सकाळी ११:०० ते १२:०० दरम्यान *मुळशी धरणाच्या सांडव्यातून १००० क्युसेक्सने विसर्ग सूरू करण्यात येणार आहे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


दि. १६ आगस्ट २०२० । वेळ स ९:०० वा


 


        *जाहीर सूचना-मुळशी धरण*


 


प्रति,


पूर नियंत्रण कक्ष, पुणे-पिंपरी-चिंचवड/ कार्यकारी अभियंता, पुणे पाटबंधारे विभाग/शाखा अभियंता पिरंगूट/ तहसिलदार मुळशी/पोलिस निरीक्षक, पौड


 


*. धरण पाणलोट क्षेत्रातील पर्ज्यन्यमानानुसार त्यामध्ये वाढ संभवू शकतो. 


 


तरी कृपया धरणाच्या खालील भागातील नदी काठची गावे, वाड्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरीकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदी पात्रात प्रवेश करू नये. वीजेवरील मोटरी, इंजिने, शेती अवजारे अथवा तत्सम साहित्य तसेच पशुधन यांचेही सुरक्षिततेची काळजी घेऊन कोणत्याही प्रकारे जीवीत वा वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असे आवाहन करण्यात येत आहे.


 


कृपया याची नोंद घ्यावी आणि नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना तात्काळ देण्यात याव्या; ही विनंती.


 


बसवराज मुन्नोळी


धरण प्रमुख - टाटा पाॅवर