डॉ.सुनील भंडगे यांना 'लोकशाहीर अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय आदर्श संशोधक पुरस्कार' प्रदान 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


        


 


पुणे:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुनील भंडगे यांना द इंग्लिश एज्युकेटर्स सोसायटी, अंबाजोगाई यांनी आयोजित केलेल्या 'अण्णा भाऊ साठे: एक बहुआयामी व्यक्तिमत्व' या विषयावरील रविवारी झालेल्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनार मध्ये 'अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय आदर्श संशोधक पुरस्कार' प्रदान करण्यात आला. डॉ.भंडगे यांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे.                                                


    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ.नितीन करमळकर तसेच प्र-कुलगुरू डॉ. ‌एन.एस.उमराणी यांनी डॉ. भंडगे यांचे पुरस्काराबद्दल अभिनंदन केले आहे.                                       


 या आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये सौ. परिन सोमानी, लंडन, डॉ.सिबील, वाराणसी, डॉ.बिरादार, कर्नाटक, डॉ.भीमराव भोसले, हैद्राबाद, डॉ.महेंद्र भवरे, डॉ.रमेश लांडगे इ. यांनी सहभाग घेतला. या पुरस्कारामध्ये प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह इ.चा समावेश आहे, अशी माहिती या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजिका सौ. अनुप्रिता मोरे यांनी दिली.