डॉ. राजेश देशमुख आता पुण्याचे नवे जिल्हाधिकारी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल डॉ. राजेश देशमुख यांची पुणे जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर त्यांच्या जागी कोण? याबाबत चर्चा सुरु झाल्या होत्या. अखेर डॉ. राजेश देशमुख पुण्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.


 


डॉ. राजेश देशमुख हे सन २००८ सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी सातारा जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून देखील काम पाहिले आहे. शिवाय, यवतमाळ येथे त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून काम केलं आहे. डॉ. राजेश देशमुख यांच्या लोकाभिमुख कामगरीमुळे त्यांना पुणे जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आता ते पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची जागा घेतील. राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावर नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांची जाग रिक्त झाली होती. राम यांची पीएमओमध्ये नियुक्ती झाल्याने पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. दरम्यान, आज सोमवारी राज्य सरकारने पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. राजेश देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.


 


यवतमाळ जिल्ह्यात फवारणीतून विषबाधा झाल्याने तब्बल २२ शेतकरी आणि शेतमजुरांचा मृत्यू झाला होता. फवारणीद्वारे विषबाधा होऊन मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याची पहिलीच घटना होती. अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी डॉ. राजेश देशमुख यांनी कंबर कसली होती. डॉ. राजेश देशमुख यांनी यासाठी जनजागृतीची मोहिम हाती घेतली होती. त्याचा परिणाम दिसून आला असून गेल्या दोन वर्षांत विषबाधाने एकही मृत्यू झालेला नाही. दरम्यान, पुण्याचे जिल्हाधिकारी पद स्विकारल्यानंतर पुण्यातील कोरोना स्थिती आटोक्यात आणण्याची मोठी जबाबदारी डॉ. राजेश देशमुख यांच्यावर असणार आहे.