अंशुमनची नवी इनिंग.... 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 



 


सोनी मराठी वाहिनीवर २१ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या 'सिंगिंग स्टार' या कार्यक्रमात अभिनेता आणि गायक अशा जोड्या स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत. याच जोड्यांमध्ये एक जोडी आहे अंशुमन विचारे आणि जुईली जोगळेकर. अंशुमनला सर्वांनी विनोदी अभिनय करताना पाहिलं आहे पण अंशुमनला गाणं हे प्रचंड आवडत तो गाणं शिकलेला नाही पण जे काही गाणं तो गाऊ शकतो ती त्याला दैवी देणगी आहे असं तो मानतो आणि सोनी मराठी वाहिनीवरील सिंगिंग स्टार या कार्यक्रमामुळे त्याला गाणं शिकण्याची संधी मिळणार असल्याचंही तो म्हणतो या संगीतमय प्रवासात अंशुमनची साथ देणार आहे गायिका जुईली जोगळेकर. जुईली नव्या पिढीची युवा गायिका आहे. तिचे सोशल मीडियावर देखील खूप फॉलोवर्स असून तिचं युट्युब चॅनेल देखील आहे. 


 


अंशुमन आणि जुईलीची चांगलीच गट्टी जमली असून जुईली अंशुमनला दादा म्हणते तर अंशुमन सुद्धा तिला लाडाने तायडी म्हणतो. या जोडीने आपल्या रियाजाला सुरुवात केली असून स्पर्धेसाठी सज्ज होत आहेत. 


 


 


 


'सिंगिंग स्टार' हा सोनी मराठी वाहिनीवरला गाण्यांचा पहिला स्पर्धात्मक कार्यक्रम अतिशय भव्यदिव्य स्वरूपात सादर होणार आहे. संगीतातले दिग्गज सलील कुलकर्णी, बेला शेंडे आणि अभिनेता, गायक प्रशांत दामले; हे या स्पर्धेचे परीक्षक आहेत आणि छोट्या पडद्यावरचा ग्लॅमरस चेहरा म्हणजेच ऋता दुर्गुळे या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करणार आहे. 


 


 


 


२१ ऑगस्टपासून 'सिंगिंग स्टार' हा कार्यक्रम शुक्रवार-शनिवार रात्री ९ वा. प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा कार्यक्रम म्हणजे रसिक प्रेक्षकांसाठी संगीताची मेजवानीच असणार आहे.