पुणे प्रवाह न्युज पोर्टल
शिवतेज मित्र मंडळाच्यावतीने सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील रक्तदान शिबिराचे आयोजन
पुणे लष्कर भागातील गवळीवाडा येथील शिवतेज मित्र मंडळाच्यावतीने सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . बुटी स्ट्रीटवरील परमार हॉलमध्ये हे रक्तदान शिबीर पार पडले . ३५ पिशव्या रक्त जमा झाले .
भारती हॉस्पिटलच्या रक्तपेढीने विशेष सहकार्य केले . रक्तदान केलेल्याना रक्तदात्यास प्रमाणपत्र , सॅनेटायजर, ९५ नंबरचा मास्क , व डेटॉल साबण देण्यात आले . अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष मुकेश पैलवान यांनी दिली .
या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यासाठी निखिल हिरणवाळे , माजी नगरसेवक शैलेंद्र बिडकर , मुकेश पैलवान , माणिक पैलवान , वैभव तायशेटे , गणेश पैलवान , सनी बिडकर आदींनी विशेष परिश्रम घेतले .