“मनरेगा वतीने ग्रामविकास सखोल मंथन”शाश्वत या विषयावर राज्यस्तरीय सरपंच परिषद संपन्न.“मनरेगा वतीने ग्रामविकास सखोल मंथन”शाश्वत या विषयावर राज्यस्तरीय सरपंच परिषद संपन्न.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


मनरेगाच्या वतीने “ग्रामविकास... सखोल मंथन”राज्यस्तरीय सरपंच परिषद ८ ऑगस्ट २०२० रोजी संपन्न झाली.कोरोंना संकटात,लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ही परिषद ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली.स्पार्टबन सोशल वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि विविध सहयोगी संस्थांच्या योगदानाने ही सरपंच परिषद अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली.परिषदेत सर्वांचे स्वागत आणि प्रस्तावना स्पार्टबन सोशल वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडियाचे चेअरमन डॉ.श्री प्रशांत खांडे यांनी केले.यावेळी बोलतांना त्यांनी,”सध्या राज्यात आरोग्य बाबत परिस्थिति लक्षात घेता एकत्र येणे शक्य नसतांना ही सरपंच परिषद घेवून त्याचा फायदा ग्रामविकास करण्यासाठी कसा होणार आहे हे संगितले.जेव्हा आपण सक्षम भारत निर्माण करण्याची भूमिका घेतो,तेव्हा त्याची सुरुवात ही गावातूनच होवू शकते हे त्याचे मत त्यांनी स्पष्टपणे मांडले.या सरपंच परिषदेत तज्ञ मार्गदर्शक पद्मश्री पोपटराव पवार,माजी विभागीय आयुक्त चंद्र्कांत दळवी,भास्कर पेरे पाटील,भीमराव वराळे-यशदा,एमजीएम विद्यापीठ कुलगुरू सुधीर गव्हाने,आणि मनरेगा अभ्यासक प्रमोद जिंजाळे यांनी मार्गदर्शन केले.पोपटराव पवार यांनी राजकारणापासून दूर राहून ही ग्रामविकास करता येतो असे संगितले.सरपंच नाथाभाऊ कदम,सरपंच गौतम ढाणे,सरपंच नरेंद्र पाटील यांनी प्रत्यक्ष कामाचा अनुभव सांगितला,समारोप प्रसंगी खासदार व लोकसभा गटनेते-शिवसेना विनायक राऊत यांनी या ऑनलाइन परिषदेचे कौतुक केले.आपल्या परिषदेतील काही मागण्या सूचना आम्हाला पाठवा आम्ही लोकप्रतिनिधी त्याचा नक्की विचार करू असे संगितले.सरपंच परिषद यशस्वी करण्यासाठी फेडरेशन कोअर टिम सदस्य प्रीती काळे व निर्मल ठाकुर यांनी सूत्रसंचालन आणि मयूर बागूल यांनी आभार प्रदर्शन केले.कपिश कोसळगे आणि प्रशांत कुंभार यांनी सर्व ऑनलाइन सूत्रे समर्थपणे हाताळली.सदरील परिषद घेण्यासाठी सर्व सहयोगी संस्था त्यात भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ,उदयकाळ फाउंडेशन,संपर्क,नवी उमेद,अखिल रयात क्रांतिकारी संघ,महात्मा फुले समाज सेवा मंडळ,व रयत सेवक एज्युकेशन अँड मल्टीपर्पज सोसायटी यांनी सहकार्य केले तसेच फेडरेशनच्या सर्वच कोअर टिमचे मोलाचे सहकार्य या परिषदेच्या आयोजनात लाभले आहे. 


 


छायाचित्र :खा.विनायक राऊ