नदीकाठच्या लोकांना सतर्कतेच्या सूचना

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


दि. २१ आगस्ट २०२० । वेळ स. ५.०० वा


 


         *जाहीर सूचना - मुळशी धरण*


 


आज दि. २१ आगस्ट २०२० रोजी पहाटे ४:०० वा मुळशी धरण १००% भरले असून धरण जलाशयामध्ये मोठ्या प्रमाणात आवक नोंद होत आहे. तरी, सकाळी ७:०० वा मुळशी धरणाच्या सांडव्यातून विसर्ग ३५०० क्युसेक्स करण्यात येणार आहे. पर्ज्यन्यमानानुसार विसर्गामध्ये ७५०० क्युसेक्स पर्यंत वाढ करण्यात येईल याची कृपया नोंद घेण्यात यावी आणि नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना तात्काळ देण्यात याव्या; ही विनंती. 


 


बसवराज मुन्नोळी,


धरण प्रमुख - टाटा पाॅवर