*मराठा प्रवर्गातील युवक-युवतींना व्यवसायाची संधी* *अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ घ्यावा*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


 


 पुणे,दि.११: जिल्ह्यातील मराठा आर्थिक दुर्बल घटकातील तरुण-तरुणी, युवक व उद्योजक बनू इच्छिणाऱ्या आणि तशी क्षमता असणाऱ्या व्यक्तींना सहाय्य पुरवण्याच्या दृष्टीने छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने व्यावसायिक कर्जावरील व्याज परतावा योजना व कर्ज पुरवठा योजना राबविण्यात येतात. अण्णासाहेब पाटील वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत पुणे जिल्ह्यातील १ हजार ४१८ लाभार्थ्यांना विविध बँकेमार्फत ८० कोटी ६० लाख ६८ हजार २१२ रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे. तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत पुणे जिल्ह्यातील ८४१ लाभार्थ्यांना २ कोटी ५३ लाख ७१ हजार ५८५ रुपये व्याज परतावा देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा समन्वयक संकेत लोहार यांनी दिली आहे.  


                


मराठा समाजातील युवक युवतींनी नोकरीपेक्षा स्वतःचा उद्योग, व्यवसाय उभारणीला प्राधान्य देण्यासाठी महामंडळाच्या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच सिबिल (CIBIL) प्रणाली अंतर्गत येणाऱ्या बँकांनीही या योजने अंतर्गत असणाऱ्या प्रकल्पांना मंजुरी द्यावी, असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी केले आहे.


 


अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेऊन दुग्ध व्यवसाय, प्रवासी वाहने, किराणा दुकान, शेळीपालन, झेरॉक्स सेंटर, सायकल दुरुस्ती, चर्मोद्योग , फोटोग्राफी, गारमेंट्स, रिक्षा, घरगुती मसाले इत्यादी व्यवसाय यशस्वीरित्या सुरु केले आहेत. महामंडळाचे काम जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे कार्यालयामार्फत केले जाते. मराठा प्रवर्गातील लाभार्थ्यांनी महामंडळाच्या संधीचा लाभ घेऊन व्यवसायाला सुरुवात करावी, असे आवाहन पुणे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.


0000000


Popular posts
पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारांची वाकड पोलिसांनी धिंड काढली आहे.
Image
चिखलवाडी येथील जुन्या ड़े्नेज लाईन वारंवार तुंबुन ,सांडपाणी घरात घुसते.....मा.फिरोज मुल्ला
१८ मार्च ते २२ मार्च दरम्यान पिंपरी चिंचवड शहरात आमदार अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी स्पर्धा होणार आहेत.
Image
बांधकाम कामगारांसाठी मेडिक्लेमसारखी आरोग्य योजना सुरू करावी व नोंदणी प्रकिया तसेच मिळणाऱ्या लाभाच्या अटी शिथिल करा - प्रकाश मुगडे
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image