पुण्‍यातील मुख्‍य ध्‍वजारोहण राज्‍यपाल कोश्‍यारी यांच्‍या हस्ते*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 *


 


पुणे दि. १२:- राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवार, दिनांक१५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी पुण्याच्या विधानभवन (कौन्सिल हॉल) येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ  होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.  


      विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या समारंभाच्या अनुषंगाने पूर्वतयारी बैठक  पार पडली. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार पुण्याच्या विधान भवन (कौन्सिलहॉल) येथे होणाऱ्या पूर्वतयारीबाबत चर्चा करण्यात आली.  यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, पोलीस उपायुक्त मितेशघट्टे, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, सुनील गाढे, प्रवीण साळुंके, श्रीमंत पाटोळे, आरती भोसले, उपविभागीय अधिकारी  संतोषकुमार देशमुख, कार्यकारी अभियंता चौगुले, पुणे शहराच्या तहसिलदार तृप्ती पाटील, हवेलीचे तहसिलदार सुनिल कोळी, जिल्हा रुग्णालयाचेप्रशासकीय अधिकारी श्री. बांगडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.  


       विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेता उपस्थितांसाठी मंडप उभारणी करणे, कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांना निमंत्रण पत्रिका वेळेत पोहोच करणे, निमंत्रितांना रांगेत उभे राहण्यासाठी जागेचीआखणी करणे, ‘कोरोनायोद्धे’  म्हणून डॉक्टर, सफाई कामगार, आरोग्य सेवक यांच्यासह कोरोना आजारावर मात केलेल्या नागरिकांना निमंत्रित करणे, कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या सर्व संबंधितांनी सामाजिक अंतराचे पालन करणे, मास्कचा वापर बंधनकारक करणे, कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त श्री. राव यांनी दिल्या.


*****


Popular posts
बंड गार्डन पाेलिस निरीक्षक मा. अमाेल काळे साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ; साहेबांना कोरोना योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले
Image
न्यू आर्या फाऊंडेशनच्यावतीने समाजाला आधार देण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन
Image
पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान- जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील
Image
💃🏻*Traditional Kanchipuram at its finest and most classic
Image
महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, काँग्रेस भवन मध्ये आज महत्वपूर्ण बैठक संपन्न...
Image